Homeकोपरगाववारकरी सहवासात पंढरीचा आनंद - सौ.स्नेहलताताई कोल्हे

वारकरी सहवासात पंढरीचा आनंद – सौ.स्नेहलताताई कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

काही काळ का होईना वारकरी सहवासात,दिंडीत सहभागी झाले तर पंढरपूर केल्याचा आनंद मिळतो, नारायण शेठ अग्रवाल गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून दिंडीची सेवा करतात इतरांनीही दानाचे पुण्य पदरी घ्यावं असं आवाहन माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिंडी प्रसंगी व्यक्त केले.

मनमाड ते पंढरपूर जाणारी श्री संत कैकाडी महाराज ( कै.रामदास महाराज जाधव ) यांची दिंडी नारायण शेठ अग्रवाल यांच्या कडे मुक्कामी असते.त्याप्रसंगी ते काही ना काही तरी भेटवस्तू देऊन सन्मानित करीत असतात.

सालाबादप्रमाणे यंदाही दिंडीचे स्वागत करण्यात आले.टाळ मृदंग वीणा भजन गात,डोईवर तुळस घेऊन सौ.स्नेहलता ताई कोल्हे,अग्रवाल परीवारातील महिलांनी दिंडीत सहभागी होऊन वारीचा आनंद घेतला.

या प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने औषधे,कोपरगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधे,रोटरी क्लबच्या वतीने काही वस्तू वारकऱ्यांना प्रदान करण्यात आले.

नारायण शेठ अग्रवाल यांनी जेवणासाठी स्टीलचे ताट दिले.

दिंडीच्या स्वागतासाठी जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष सौ.सुधा भाभी ठोळे,महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी विजय बंब उत्तम भाई शहा आशुतोष पटवर्धन डॉ विलास आचार्य,पराग संधान नयनकुमार वाणी कांतीशेठ अग्रवाल मयुर जोबनपुत्रा जितेंद्र गंगवाल आणि बंधु यांचेसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सनेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.स्वागत व प्रास्ताविक विरेन अग्रवाल यांनी केले. सुत्रसंचलन स्वच्छता दुत सुशांत घोडके यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचा तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व समारंभ पाहून वारकरी भाराऊन गेले.
कोपरगाव भक्तीमय रसात चिंब भिजून गेले.वारकरी सहवासात दिंडीचा आनंद घेऊन समाधानी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!