Homeकोपरगावकोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे… याकडे लक्ष वेधले

कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे… याकडे लक्ष वेधले

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचे निवेदन दि.२७ जुलै २०२३ रोजी देऊन दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेतले.

यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र तासकर,जिल्हा संघटक सोमनाथ उफाडे,तालुकाध्यक्ष जावेद खाटीक,शहराध्यक्ष अफजल पठाण, बाबासाहेब कहार,अशोक पगारे यांसह आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहत आणण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनांचा अवलंब केला आहे.परंतु त्याची अमलबजावणी मात्र, अधिकारी वर्ग करतांना दिसत नसल्याने दिव्यांगांना वेळोवेळी उपोषणे, ठिय्या आंदोलन,घंटानाद आंदोलन,धरणे आंदोलन या सारखे आंदोलने करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग आणावी लागत असल्याचे दुदैव दिव्यांगांच्याच नशीबी का ? कुणास ठाऊक ! यास कर्मचारी वर्ग जबाबदार कि,शासन हेच कळेना अशी खंत अपंग जनता दल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे व अहमदनगर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार राजेंद्र तासकर यांनी व्यक्त केली.

आज अपंग जनता दलाच्या वतीने करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत मार्फत ५ % निधीचे वाटप येत्या १५ दिवसात करण्यात येऊन त्याचा अहवाल मागवून त्याची एक प्रत अपंग जनता दल संघटनेस देण्यात यावी,अपंगांना कार्यालयात येण्या- जाण्यास व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी,समाजकल्याण विभाग दिव्यांगांच्या दृष्टीने ग्राउंड लेवल ला असावा, कार्यालयामार्फत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतीचा जाहीर फलक कायमस्वरूपी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा यासह अन्य मागण्या गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहे. यामध्ये समाजकल्याण विभाग ग्राउंड लेवलला असावा ह्या मागणीची तात्काळ अमलबजावणी करण्यात आल्याने दिव्यांगांनी समाधान व्यक्त करत गटविकास अधिकारी यांचे आभार मानले व ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!