
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव : साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात १ ऑगष्ट रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष तथा आर पी आय आठवले पक्षाचे ता.उपाध्यक्ष फकिराभाऊ चंदनशिव यांच्या वतीने सकाळी अण्णाभाऊ साठे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,तद्नंतर राजेंद्रजी दिवेकर सर यांचे व्याख्यान,तसेच दौलतभाऊ शिरसाठ यांच्या सुमधुर आवाजात अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारीत गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.


त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे वतीने स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा अनेकविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या जयंतीच्या निमित्ताने माजी.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देत सर्व समाज बांधवांना शुभेच्या दिल्या

यावेळी विशेष सहकार्य आर पी आय (आठवले गट) तालुकाध्यक्ष अनिल (आण्णा) रनणवरे,ता.सल्लागार सोमनाथ भाऊ लोहकरे,शहर अध्यक्ष रामदास भाऊ कोपरे,शहर उपाध्यक्ष अमोल थोरात,रवींद्र भाऊ शिंदे,सागर भाऊ,विसपुते,आकीलभाई शेख,शहर उपाध्यक्ष आनीस शेख,संपर्क प्रमुख संदीप दुशिंग,प्रसिद्धी प्रमुख आनंद कोपरे,किरण गायकवाड,अजय उशीरे, रवींद्र भालेराव,राहुल गायकवाड, अलतमश अत्तार,योगेश शेलार, आकाश चंदनशिव,विकास दुशिंग मच्छिंद्र शिरसाठ,शिवा चंदनशिव आदी कार्यकर्त्यांनी मोलाच सहकार्य केल
तर प्रमुख उपस्थिती म्हणुन सनी (अण्णा) वाघ,रवी अण्णा पाठक,रवी नाना कथले,किरण भाऊ डांगे, सोमनाथ भाऊ म्हसके,जयवंत मरसाले, राजेंद्र बागुल,नितीन साबळे, शरद त्रिभुवन,ऍडव्होकेट नितीन पोळ,आदी मान्यवर उपस्थित होते