
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील धार्मिक व शेतकरी कुटुंबातील व निळकंठ परिवारातील मनमिळाऊ व्यक्तिमत्व असणारे तसेच शहा सारख्या खेडे गावात श्रीकाल भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. संभाजी जाधव सर यांच्यासमवेत एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले,शैक्षणिक क्षेत्रात बहुमान मिळविणारे प्राचार्य मा.श्री. निळकंठ अतुल सोमनाथ यांना शिवनिका संस्थान मिरगाव ता.सिन्नर, जि.नाशिक या संस्थेच्या वतीने आदर्श प्राचार्य म्हणुन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.नामदार दिपकजी केसरकर, संस्थांचे अध्यक्ष कॅप्टन अशोकजी खरात,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपालीताई यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित करून गौरविण्यात आले आहे.


यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.नामदार दिपकजी केसरकर, संस्थांचे अध्यक्ष कॅप्टन अशोकजी खरात,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपालीताई तसेच श्री काल भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संभाजी जाधव सर यांसह सन्मानार्थी प्राचार्य,शिक्षक -शिक्षिका, संस्थानचे सर्व पदाधिकारी,मान्यवर, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
मा.प्राचार्य निळकंठ सर यांनी गौतम पॉलिटेक्निक इंस्टिट्युटस कोळपेवाडी येथे काही वर्षे स्पेशल इंग्लिश प्राध्यापक म्हणून आपली सेवा बजावत असतांना त्यांचे एक शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून स्थान निर्माण झाले होते व त्यानंतर शहा येथील श्रीकालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.संभाजी जाधव सरांच्या एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेली अनेक वर्षापासून प्राचार्य म्हणून आज तागायत आपली सेवा बजावत आहेत.त्यांना शिवनिका संस्थान मिरगाव या संस्थानच्या वतीने आदर्श प्राचार्य म्हणून सन्मानित करण्यातआल्याबद्दल त्यांच्यावर नाशिक, अहमदनगर,पूणे, ठाणे,संभाजीनगर जिल्ह्यासह पंचक्रोशितुन सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.