
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले श्रीकाल भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे,एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी अनेकविद स्पर्धैचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.त्याचेच एक फलित म्हणून (दि. २८) रोजी नंदुरबार येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटातील विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमार ओम गणेश सोमवंशी या विद्यार्थ्याने ७५ किलो वजन गटात भोसला मिलिटरी स्कूलच्या खेळाडूस पराजित करून घवघवीत यश संपादित करून पहिला क्रमांक मिळविला आहे.तद्नंतर अकोले येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सिन्नर तालुक्यातून प्रथमच या शाळेने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाल्याचा बहुमान मिळविल्याने एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूल,विद्यार्थी व त्यांना प्रशिक्षण देणारे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.निवृत्ती मुरडणर सर यांच्यावर नाशिक जिल्ह्यातून सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निवड झालेल्या ओम सोमवंशी या विद्यार्थ्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी मार्गदर्शन करतांना श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक,आदरणीय श्री संभाजी जाधव सर यांनी क्रीडा खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले त्याचबरोबर स्वतःमध्ये असणारी जिद्द,चिकाटी,मेहनत आणि सातत्य हिच खरी यशाची गुरुकिल्ली असून, यशस्वी जीवनाचा मुलमंत्र असल्याचे ही सांगितले.तसेच शाळेचे प्राचार्य श्री निळकंठ सर यांनी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेची संस्थापक मा. संभाजी जाधव सर,सौ शुभांगी जाधव, प्राचार्य मा.अतुल निळकंठ,क्रीडा शिक्षक निवृत्ती मुरडणर,वर्ग शिक्षक कैलास वर्पे,अनिल चतुर,सौ. निलोफर शेख,सौ.रूपाली निरगुडे, सौ.प्रियंका पगार,संदीप शिंदे,सुरेश पारधी,सौ.वर्षा उगले,सचिन जाधव, मुकुंद शिरसाट,प्रीतम जाधव,सचिन ठाकरे,सौ.भाग्यश्री जाधव,सौ.मनीषा वाणी, सौ.सुमन दत्ता,सौ.संगीता अस्वले,कु.प्रतीक्षा जाधव यांस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थित होते व सर्वांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चतुर सर यांनी केले.