
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा देवकर वस्ती(टाकळी) येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोपरगाव यांच्या वतीने 13120/ रुपये किमतीच्या स्कूल बॅगचे वाटप (दि.९ डिसेंबर २३) रोजी करण्यात आले. त्याचबरोबर शिर्डी संस्थानचे श्री.बाबासाहेब मालकर यांचेकडून १८०० रुपयांच्या तीन खुर्च्या शाळेस भेट स्वरूपात देण्यात आल्या.
सदर प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री सुमित भट्टड,सचिव श्री.प्रसाद भास्कर,अक्षय गिरमे संदीप राशिनकर,श्री.मोहन उकिर्डे,श्री शिंदे सर,श्रीराम थोरे साहेब,माजी सभापती सुनील भाऊ देवकर,सरपंच श्री.संदीप देवकर smc अध्यक्ष श्री.सचिन देवकर,उपाध्यक्ष सचिन मालकर आदि उपस्थित होते.
यावेळी सभापती सुनील देवकर म्हणाले कि,जिल्हा परिषद शाळेतच मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.लायन्स क्लबने हाती घेतलेल्या जनसेवेच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय खरात यांनी केले तर शेवटी श्रीमती उज्ज्वला शेळके यांनी आभार मानले.