Homeकोपरगावदिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची नियुक्ती

दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची नियुक्ती

मुकुंदमामा काळे म्हणजे दिव्यांगाचा आधार

दिव्यांग म्हटले की त्या व्यक्तीला बाजूला केले जायचं मग तिथं शासन असो किंवा कोणीही असो दिव्यांगाना आधार नव्हता आधाराची गरज होती.मी जेव्हा पाहिले मुकुंद मामा काळे यांच्या संपर्कात आलो तेव्हा पासून माझे व माझे दिव्यांग मित्र परिवाराचे प्रश्न सुटले.आज त्याव्यक्तीने आयुष्यातील कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवु दिली नाही म्हणून त्यांची निवड झाली.आज जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बाब असून मुकुंदमामा यांच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागणार यात शंकाच नाही.

श्री.बापुराव काणे साहेब (राज्य अध्यक्ष,प्रहार दिव्यांग क्रांती

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे व संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांगांचा आधार म्हणून ओळखले जाणारे मुकुंद(मामा) काळे यांच्या कार्याची दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी दखल घेत श्री.काळे यांची दिल्ली येथील दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्ती संकटास सामोरे जात आहे त्यात काही ना संघर्ष करून यश मिळत असते अशा या संघर्षात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यशस्वी झाले आहे.यांच्या पुढे देखील अनेक संकटे आली परंतु त्यात मुकुंदमामा काळे यांनी हार मानली नाही.पुढचे पाऊल पुढे टाकतआलेल्या संकटांचा सामना करून यश मिळवलं आहे.म्हणून त्यांना संघर्षातुन यश मिळवणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.आज याच कार्याची पावती म्हणून दिल्ली येथील दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली.


श्री.मुकुंदमामा काळे यांच्या नियुक्ती बरोबरच श्री.मोहन लक्ष्मण निकम यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर,राष्ट्रीय सचिव वाल्मीक महाराज जाधव, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे,राज्य अध्यक्ष यशवंत शिरसाठ व अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!