
धावपटू कविता राऊत.यांनी एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना सांगितले खेळाचे महत्व..

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल शहा मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या उद्घाटन समारंभाचे विशेष आकर्षण सावरपडा एक्सप्रेस म्हणूनओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपिक धावपटू कविता राऊत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच महा. जनको अभियंता महेश तुंगारे,उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा शेख,संस्थेचे अध्यक्ष मा.संभाजी जाधव,संस्थेचे विश्वस्त कैलास जाधव, उपाध्यक्ष सौ.शुभांगी जाधव हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन स्पोर्ट ध्वजाचे अनावरण करून करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक निवृत्ती मुरडनर व श्री अनिल चतुर यांनी ही संयोजन केले.तसेच स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना दिली.शाळेच्या सिंगिंग ग्रुपच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.
सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य अतुल निळकंठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन पाहुण्यांची ओळख करून दिली.तसेच शाळेचा विद्यार्थी ओम गणेश सोमवंशी याने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला तसेच शाळेची विद्यार्थिनी कु.समृद्धी सरवार सिने अभिनेत्री (सत्यशोधक) हीचा व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री निवृत्ती मुरडणार यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी कविता राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी.तसेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपण खेळू शकतो याचे महत्त्व समजावून सांगितले.पालकांनी देखील आपल्या पाल्याला खेळाकडे आकर्षित कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मी.संभाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले.अभ्यासा बरोबरच खेळाला ही पोषक वातावरण निर्मितीवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संभाजी जाधव यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य,क्रीडा विभाग प्रमुख व शिक्षकांच्या सहकार्यातून वार्षिक क्रीडा स्पर्धा महोत्सव २०२३- २४आयोजित करण्यात आला.

यावेळी शाळेचे कलाशिक्षक संदीप शिंदे यांनी त्यांचे पेन्सिल पोट्रेट भेट दिले.कविता राऊत यांचे जीवनावर आधारित सावरपाडा एक्सप्रेस इयत्ता पाचवीच्या मराठी पुस्तकातील पाठाचे श्री पारधी सर यांनी वाचन केले.या प्रसंगी शाळेचे प्राचार्य,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक तसेच भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समीक्षा पेखळे व कु.समीक्षा थोरात या विद्यार्थिनींनी केले.व शेवटीकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुमन दत्ता यांनी केले.