
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -भारतीय चित्रपट व दुरचित्रवाहिनी क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि कलाकाराना सर्वोत्तम कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकैडमी अवॉर्ड 2024 ” पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे संपन्न झाला.
याप्रसंगी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टितील व सीरियल मधील कलकारानी आपली उपस्थिती दर्शविली,सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टिला आपल्या अभिनयाने गाजलेले अभिनेते दीपक शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बिगबॉस फेम् व सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई तसेच मोनालिसा बागल,प्रांजलि भालेराव तसेच जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अनेक तंत्रज्ञ उपस्थित होते यावेळी अनेक कलाकारांचा गौरव करुन पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कोपरगाव तालुक्याचे भूषण डॉ.अशोक गावित्रे यांना देखील सर्वोकृष्ट सामाजिक विषय व दिग्दर्शन यासाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकैडमी बेस्ट डायरेक्टर हा अवॉर्ड देवून सिने अभिनेते दीपक शिर्के व बिगबॉस फेम् तृप्ति देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देवून पुरस्कृत करण्यात (गौरविण्यात)आले.
डॉ.गावित्रे यांनी चिकनगुणीया सारख्या आजारावर रामबाण इलाज करून संपूर्ण तालुक्यात अनेक रुग्ण ठिक केले.त्याचप्रमाणे कोविड काळातही आपल्या सहकार्याबरोबर रात्रंदिवस मदत कार्य चालू ठेवले हेच नव्हे यासारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून डॉक्टरकी बरोबर हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत ते अविरतपणे चालवत आहे.त्याचबरोबर सिनेसृष्टीतही त्यांनी उत्कृष्ट रित्या केलेल्या कामाची पावती म्हणून दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकैडमी अवॉर्ड ने त्यांना नुकतेच संन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या पुरस्काबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशी सह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.