Homeकोपरगावभारतीय खेळ प्रधिकरण (साई) अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी.

भारतीय खेळ प्रधिकरण (साई) अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव:-भारतीय खेळ प्रधिकरण (साई) भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करते.या संस्थेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या उद्देशाने ‘खेलो इंडिया रायझींग टॅलेन्ट आयडेंटिफिकेशन’ उपक्रमा अंतर्गत आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमीमध्ये दिनांक २७ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

आत्मा मालिक मध्ये होणाऱ्या या निवडचाचणीमध्ये कबड्डी,हॉलीबॉल, खो-खो,फुटबॉल व अॅथेलेटिक्स या क्रिडा प्रकारामध्ये वय वर्ष ०९ ते १८ वयोगटातील मुले व मुली सहभाग घेवू शकतात.त्यासाठी खेळाडूंनी मायभारत पोर्टल https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

यावेळी बोलताना आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की,आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमी मधील कुस्ती व हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांना साईची मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र असून राज्यातील खेळाडू या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे.खेळाडूंना वाव देण्यासाठी साई हा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना साई मार्फत प्रशिक्षण संधी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यास निश्चितच मदत होणार आहे.आत्मा मालिकमधील शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये १००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून एक किर्तीमान नोंदविला आहे.तरी या निवड चाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!