Homeकोपरगावअशोक जाधव यांनी जपले अनोखे पक्षी प्रेम

अशोक जाधव यांनी जपले अनोखे पक्षी प्रेम

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अशोक रामनाथ जाधव यांनी अनोखे पक्षी प्रेम जपले असून ते पशुपक्ष्यांसाठी वर्षभर धान्य,पिण्याचे पाणी तसेच निवारा या गोष्टींना प्राधान्य देतात.त्यांचे चिरंजीव व कन्या या कामात त्यांना सातत्याने मदत करतात.

भूवैश्मीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे,दिवसेंदिवस उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे, जंगलतोड प्रचंड वाढली आहे, उष्णतेमुळे मनुष्याच्या अंगाची लाही लाही होत आहे,पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात बदलू लागले आहे, डिसेंबर जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई तीव्र भासत आहे,बागायती भागातील विहिरींनी देखील तळ गाठला आहे,बदलत्या पर्यावरणाचा फटका परिसराबरोबरच स्वच्छंदतेने विहार करणाऱ्या पशुपक्षांना बसत आहे.,पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले तर त्याचे दूरगामी परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार आहे.हे ओळखून अशोक जाधव यांनी पशुपक्ष्यांना उन्हाळा, पावसाळा,हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये अन्नधान्य सह पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

अशोक जाधव यांना त्यांच्या माता पित्यांनी दिलेल्या शिकवणीतून ते सतत पशुपक्षांची काळजी घेतात, मनुष्याला तहान लागली तर तो बोलू शकतो आणि पाणी मागू शकतो पण पशुपक्षी कुठे जाणार यातून ते त्यांच्या परिसरातील,घरासमोर,नोकरीच्या ठिकाणी तसेच त्यांच्या शेतातही पशुपक्ष्यांसाठी निवारा,पाणी,धान्य याची सतत सोय करतात.यातून त्यांना मोठे आत्मिक समाधान लाभते. उन्हाळ्यात बहुतांश प्राथमिक, माध्यमिक शिक्षक मुला-मुलींना पशुपक्ष्यांसाठी पाण्याची भांडी,धान्य ठेवा अशी शिकवण नेहमी देतात, अशोक जाधव व त्यांचे कुटुंबीय सकाळ,दुपार,संध्याकाळ सतत या पशुपक्ष्यांची काळजी घेतात,हे पक्षी आनंदाने या ठिकाणी विहार करतात, त्यांचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!