Homeकोपरगावकवी प्रमोद येवले यांच्या वाढदिवसा निमित्त छोटेखानी कवी संमेलन संपन्न

कवी प्रमोद येवले यांच्या वाढदिवसा निमित्त छोटेखानी कवी संमेलन संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – कोपरगाव येथील साहित्यिक तसेच गृहरक्षक दलाचे जवान व कवी प्रमोद येवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छोटेखानी कविसंमेलन संपन्न.

यावेळी शब्दगंध साहित्यिक परीषद कोपरगाव शाखेचे अध्यक्ष कवी कैलास साळगट अध्यक्षस्थानी होते तर कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे यांनी स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या प्रसंगी साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर,कवि नंदकिशोर लांडगे, ग्रंथपाल योगेश कोळगे,गृहरक्षक दलाचे गोडसे,सव.र.म.परिख,हिंदी मराठी ग्रंथालयाचे विश्वस्त सुरेश गोरे सर,एसएसजीएम महाविद्यालयातील प्राध्यापक शेजुळ आणि मित्र मंडळ आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिंदी विभागीय अभ्यास मंडळावर निवड झाली त्या निमित्ताने शाखेच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

शब्दगंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहमदनगर येथे झालेल्या पंधराव्या साहित्यसंमेलनाची स्मरणिका सभासदांना प्रकाशित करण्यात येऊन प्रदान करण्यात आली.के जे सोमैया महाविद्यालयातील संमेलनात सहभागी विद्यार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली.

महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या समारंभ प्रसंगी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शहरातील व तालुक्यातील नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी शब्द गंध साहित्यिक परीषद अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेवटी कवी प्रमोद येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!