
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – १९८४ साली स्थापन झालेल्या मूकबधिर विद्यालय, ब्राईट माईंड ग्लोबल स्कूल व पोद्दार जम्बु किड्स या विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मूकबधिर व छोट्या बालगोपाल मुला मुलींच्या समवेत ध्वजारोहण करताना वेगळाच खूप आनंद झाला असल्याचे गौरोद्गार मंगेश पाटील यांनी काढले.

पुढे बोलताना मंगेश पाटील म्हणाले की,मूकबधिर मुलांचे गणवेश जे की शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.९ वीतील मुलांनी आपल्या पॉकेट मनी मधून सेव्हिंग करून या सर्व लहान मुला मुलींसाठी खूप छानसे ड्रेस दिले. मोठ्या मुलांनी छोट्या मुलांना आपल्या सेव्हिंगमधून घेतलेले हे ड्रेस निश्चितच कौतुकास्पद आहे.ब्राईट माईंड ग्लोबल स्कूल व पोतदार जम्बो

किड्सच्या छोट्या मुला मुलींनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्याने / निमित्ताने सोल्जर्स,स्टेनगनधारी कमांडो ड्रेसमध्ये शोभून दिसत होते.त्यांनी स्टेजवर जे स्पीच व डान्स केला,तसेच मूकबधिर मुलांनी संगीताच्या तालावर जे लेझीम खेळले ते बघून,त्यांचा अत्याधिक आनंद आम्हा सर्वांना झाला असल्याचेही श्री.पाटील म्हणाले. तसेच त्यांना शिकविणारे सर्व शिक्षक यांच्या कामाचे व ते घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.तसेच आगदी छान पद्धतीने चेअरमन अशोकराव रोमारे साहेब, सचिव संजीव जी कुलकर्णी व सर्व ट्रस्ट मेंबर व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीरजी डागा व स्कूल कमिटी मेंबर हे करत असलेल्या मुलांमुलीं करिताच्या कामाचे कौतुकही शेवटी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.
यावेळी जवाहर शेठ शहा,डॉ.तुषार गलांडे,ॲड.मनोज कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक अनुप कातकडे,या संस्थेचे फाउंडर मेंबर सदस्य जवाहर शहा, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज कडू, सचिव डॉ.तुषार गलांडे,न्यू चे अध्यक्ष धीरज कराचीवाला,ट्रेझर कैलास नागरी,ज्येष्ठ सदस्य तुलसीदास खुबानी, आर.टी. पटेल,दिलीपराव वाबळे,दुशिंग भाऊसाहेब,श्याम जंगम,अनिकेत भडकवाडे, मानस नागरे,पृथ्वी शिंदे,कैलास नागरे,संदीप राशीनकर, मोहन उकिरडे यांसह मुख्याध्यापक एकनाथ घोलवड सर, प्राचार्य श्रीमती नेहा पहाडे मॅडम,प्रचार आरती बबं मॅडम, रमेश टिकल सर यांसह सर्व वर्ग शिक्षक शिक्षिका,सर्व स्टाफ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण डुकरे सर यांनी केले.

यावेळी उद्योजक अनुप कातकडे व गोदावरी बायोरीफायनरीज प्रा.लि साखरवाडी यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश बूट,सॉक्स व खाऊचे वाटप करण्यात आले.अशा पद्धतीने ७८ वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्यात आला.