
मुख्य संपादक- राजेंद्र तासकर
कोपरगाव : – शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणारी टाकळी ब्राम्हणगांव, येसगांव,मुर्शतपुर व कोपरगांव या चार गावांच्या शिवेवर असणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कोपरगांव ब्रांच आज चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे व भरपूर विद्यार्थी संख्येमुळे टिकून आहे.या शाळेत जवळच्या या चार गावातील गरीब घरातील मुले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थ्यांना सुतकताई शिकवणारी ही शाळा आहे. विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. सुरेशराव नळे यांनी लायन्स क्लब राहाता सह्याद्रीकडे या शाळेचा इतिहास व गरीब विद्यार्थी यांचेसाठी स्कूलबॅग देण्याची कशी गरज आहे याबाबत विनंती केली.त्यानुसार क्लबच्या वतीने साई टूर्स अँड ट्रॅव्हलचे संचालक ला.ज्ञानेश्वर नळे यांनी 47 स्कूल बॅग गरीब विद्यार्थ्यांना देवू केल्या. लायन्स इंटरनॅशनल 3234 D2 चे डिस्ट्रिक्ट ॲडिशनल कॅबिनेट ट्रेझरर ला.सुधीरजी डागा व झोन चेअरपर्सन ला.सुमित भट्टड,व चेअरपर्सन पर्यावरण तथा संस्थापक ला.विनोद गाडेकर यांचे हस्ते विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रेसिडेंट तथा चेअरपर्सन मेडिकल हेल्थ कॅम्प ला. राजेंद्र फंड हे होते.
या विद्यालयाचे शिक्षक श्री.गोरे सर यांनी प्रास्तविकमध्ये या शाळेची गुणवत्ता, शतकमहोत्सवी वर्षातील विविध उपक्रम,या शाळेतील आतापर्यंतचे नामवंत विद्यार्थ्यांची माहिती दिली.तसेच ही शाळा लोकवर्गणीतुनच डिजिटल करण्यात आली आहे.प्रेसिडेंट ला.राजेंद्र फंड यांनी राहाता सह्याद्री क्लब यांनी मागील वर्षात केशवसुत फाऊंडेशन व लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री मार्फत 87 महिलांच्या गर्भाशय मुखाच्या मोफत शस्त्रक्रिया केल्यात.अनेक मेडिकल कॅम्प घेतले.शालेय विद्यार्थ्यांना वह्या,पेन,स्कूल बॅग वाटप केले.याचबरोबर इतर ही अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम राबविले.याबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुणे ला.सुधीरजी डागा म्हणाले की राहाता लायन्स क्लबने योग्य ठिकाणी मदत दिली आहे.त्यांचे सर्व उपक्रम हे सेवाभावी असतात.व इतर लायन्स क्लबसाठी ते प्रेरणा दायक असतात.या शाळेसाठी कोपरगांव क्लबने मुलींना सायकल वाटप यापूर्वी केले होते.अजूनही मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.ला. सुमित भट्टड यांनी लायन्स क्लब राहाता सह्याद्री राबवित असलेल्या विविध उपक्रमांबाबत प्रशंसा केली. मुलांना उदबोधकपर गोष्टी सांगून मनोरंजनातून उपदेश केले.
शतकमहोत्सवी वर्षात या शाळेसाठी आम्ही ही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.ला.विनोद गाडेकर यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी मुले काय मदत करू शकतात.याबाबत मार्गदर्शन करून मुलांना वृक्षारोपण, स्वच्छता,प्लॅस्टिकचा वापर थांबविण्यात मार्गदर्शन केले.ही शाळा चालविण्यासाठी जी लोकसहभागाची मदत लागते ती पार पाडण्यासाठी झटणारे ज्ञानदेवजी रहाणे यांनी या शाळेचा इतिहास व शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी समाजातील विविध संस्था व व्यक्ती यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले.
शालेय स्कूल कमेटीचे अध्यक्ष श्री सानप साहेब,मुख्याध्यापक सुरेशराव नळे,तांबे सर,भागवत सर,पावडे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे नियोजन प्रायोजक ला.ज्ञानेश्वर नळे,व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे,श्री.काळे सर,श्रीमती देवकर मॅडम,श्रीमती भालेराव मॅडम, श्रीमती पावडे मॅडम,श्रीमती खराडे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमास यावेळी सेक्रेटरी ला.सागर रोकडे,ला.बापूसाहेब गायकवाड,ला. विजय बनकर,ला.केतन कुंभकर्ण,ला. मिलिंद कडलग,ला.सचिन लोढा,ला. ॲड.सुधीर बोठे,ला.नितीन दिवटे,ला. सिराज शेख,ला.शिवम सपिके,ला. सत्यम सदाफळ,ला.प्रतिक वाघे,ला. सुनील काळोखे,हे हजर होते.