
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय.पुणे,जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर,तालुका क्रीडा समिती कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यातआलेल्या शालेय कुस्ती स्पर्धा दि.23 व 24 ऑगस्ट रोजी कोकमठाण येथील आत्मा मालीक कुस्ती केंद्र येथे घेण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रार्थनीय आत्मा मालीक ध्यान पिठाचे मा.संत योगानंदजी महाराज,संत महिंदकर महाराज,मा.बाळासाहेब पाटील उपस्थित होते.संपूर्ण तालुक्यातून १२० मुले व ३० मुली असे १५० स्पर्धक सहभागी झाले होते.
यावेळी कोपरगांव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम,जिल्हा संपर्क प्रमुख शिवप्रसाद घोडके,प्रा. मिलिंद कांबळे,प्रा.कदम,भीमाशंकर औताडे,निलेश बडजाते,किरण बोळींज, महीला प्रतिनिधी अस्मिता रायते, संजय आमोलिक,वसावे,सचिन जाधव आदी क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक संघटना प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आत्मा मालीक कुस्ती केंद्राचे राष्ट्रीय पंच,NIS विवेक नायकल यांनी त्यांच्या सहकारी क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांच्या सहकार्याने केले होते.