Homeकोपरगावनागरिकांनी खरेदीसाठी स्थानिक दुकानदारांसह व रस्त्यावरील विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या - माजी...

नागरिकांनी खरेदीसाठी स्थानिक दुकानदारांसह व रस्त्यावरील विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असल्याने गणपती सजावट साहित्य खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठा साहित्यांनी फुलून गेल्या असल्यातरी ऑनलाइन साहित्य सजावट खरेदीचे प्रमाण वाढलेले असुन नागरिकांनी ऑनलाइन खरेदीपेक्षा खरेदीसाठी स्थानिक दुकानदारांसह व रस्त्यावरील विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य दिल्यास आपल्या एका खरेदीमुळे त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरणार असल्याचे मत कोपरगाव नगरपरिषदेचे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील वृत्तपत्रे विक्रेता असोसिएशन व साक्षी गणपती सजावट साहित्य केंद्राची उद्घाटन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मंगेश पाटील बोलत होते.

ऑनलाइन कंपन्यांकडून खरेदी केल्यास त्याचा फायदा परदेशी कंपन्यांना होतो.तर मॉलमध्ये खरेदी केल्यास एकाच कंपनीचा फायदा होतो. मात्र आपल्या परिसरातील वेगवेगळ्या दुकानात खरेदी केल्यास सर्वांना आनंद मिळेल.रस्त्यावरील विक्रेता श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर पोट भरण्यासाठी विक्री करतो.त्यामुळे त्याच्याकडून साहित्य खरेदी करताना देखील भावात घासाघीस करू नये, अशी भावनाही मंगेश पाटील यांनी व्यक्त करून ते पुढं म्हणाले की, देशाच्या विकासाला हातभार लावा स्थानिक व्यवसाय हा सशक्त करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे हे नागरिकांना पटवून व समजून घेणे गरजेचे आहे.स्थानिक बाजारपेठ सशक्त झाल्यास राज्य व राष्ट्राचा विकास होऊ शकतो.परदेशी गुंतवणूक असलेल्या मॉलमध्ये झगमगाटीच्या नादी न लागता स्थानिक बाजारपेठेतच करून देशाच्या विकासात हातभार लावा असे आवाहन देखील यानिमित्ताने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील केले.

यावेळी वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन व साक्षी सजावट साहित्य केंद्राचे संस्थापक संचालक राजेश हाबडे, सनी काळे,रविंद्र दातीर व वृत्तपत्र विक्रेतेचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर यांच्या हस्ते कोपरगाव नगरपरिषदेचे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार मनिष जाधव,सचिन काळे , महेंद्र टोरपे,जगन राटनालु,वाल्मिक लिहिरे आदि पदाधिकारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!