

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -कोपरगाव येथील बजाज कोचिंग क्लास येथे नुकतीच अवयवदान कार्यशाळा पार पडली या कार्य शाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व अवयवदान समुपदेशन डॉ.अशोक गावित्रे यांनी मार्गदर्शन केले डॉ.गावित्रे हे फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व मोहन फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून प्रबोधन करत असुन,त्यांच्याच प्रयत्नातुन शिर्डी संस्थान येथे लवकरच आय बँक सुरु होत आहे.
याप्रसंगी त्यांनी अवयवदानाची संपुर्ण प्रक्रिया त्यासाठी लागणारे फॉर्म कसे व कुठे भरावे,अवयवदानाची देश, राज्य, जिल्हा पातळीवर याची आकडेवारी तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण कसा कमी करू शकतो या संदर्भातील अंधश्रद्धा याबद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच उपस्थिताच्या संपूर्ण शंकाचे निरसन केले तसेच मानवी देहाची माती किवा राख होण्यापेक्षा त्याचा इतरांना उपयोग व्हावा,मृत्यू नंतर देखील जीवंत कस रहावं याबद्दल प्रबोधन केले तसेच या अवयवदानाच्या चळवळीत प्रत्येकांनी सहभागी होण्याच आवाहन त्यांनी केले तसेच NOTTO, ROTTO,SOTTO,ZTCC ह्या कस काम करतात,प्रतीक्षा यादी कशी तयार केली जाते याबद्दल सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक व निवेदक सुहासभाई मुळे हे देखील उपस्थित होते त्यांनी ज्ञानेद्रिय व कर्मेंद्रिय याविषयी सखोल माहिती दिली


याप्रसंगी गोदावरी खोरे तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन श्री राजेशआबा परजणे पाटिल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यशाळेसाठी श्री सी.आर. बजाज व राहुल बजाज सर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या प्रसंगी नाईक सर,घाटे साहेब,जोगनपुत्र देशपांडे, शिवकालजी भंडारी, अमृतकर सर,सुशीला बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
अवयवदान संदर्भात काही मदत हवी असल्यास 7972677781 या नम्बरवर संपर्क साधावा असेही शेवटी डॉ.अशोक गावित्रे यांनी सांगितले.
॥ अवयवदान सर्वश्रेष्ठ दान ॥