Homeकोपरगावजागतिक हृदय दिनानिमित्त कुंभारी येथील राघवेश्वर मंदिरात मोफत हृदयरोग व मधुमेह निदान...

जागतिक हृदय दिनानिमित्त कुंभारी येथील राघवेश्वर मंदिरात मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन

डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : जागतिक हृदय दिनानिमित्त तालुक्यातील कुंभारी येथील जागृत राघवेश्वर देवस्थान व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर, नाशिक आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि.२९ सप्टेंबर २o२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी दिली.

यावेळी नाशिक येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी नशिक व मनोज चोपडा नाशिक यांचे व्याख्यान व मार्गदर्शन होणार व लगेच १० वाजता तपासणी होणार आहे.

या शिबिरासाठी डॉ.कुणाल निकम, डॉ. विजय साळुंके,डॉ.विजय गोडगे, डॉ. प्रथमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

या शिबिरात ब्लड प्रेशर,रक्तातील साखरेचे प्रमाण,गरज भासल्यास ई. सी.जी,स्त्रियांचे आजार तपासणी, हाडांचे आजार व तपासणी, मधुमेह निदान करण्यात येणार आहे.

तरी या शिबिराचा पंचक्रोशितील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ८८०६६३५५६० व ९९२१२ २०२८० यांच्याशी संपर्क साधावा.आपली नाव नोंदणी ९०९६३ २४७९४ या नंबर वर करावी असे आवाहन डॉ.विजय गोडगे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!