Homeनाशिकसिन्नरखेळ कोणताही असो ; विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असेल,तर यशाचे शिखर निश्चित गाठता येते...

खेळ कोणताही असो ; विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असेल,तर यशाचे शिखर निश्चित गाठता येते – मा.संभाजीराजे जाधव सर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल व या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या सर्वच विद्यार्थी – विद्यार्थीनींचे शाळेच्यावतीने अभिनंदन करून गुणगौरव करण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देतांना संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री संभाजी जाधव सर म्हणाले कि,खेळ कोणताही असो ; विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असेल,तर यशाचे शिखर निश्चित गाठता येते,विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभाग घेऊन खेळ खेळावे असेही आव्हान केले आहे.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी नाशिक येथे दि.3 ऑक्टोबर रोजी 17 वर्षे आतील मुलींच्या व दि. 6 ऑक्टोबर रोजी 14 वर्षे वयोगट व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यात एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहा मुलींनी सहभाग घेतला त्यातील 52 किलो वजन गटात कुमारी कल्याणी नरोडे हिने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला व नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे तसेच दि. ३ऑक्टोंबर रोजी झालेल्या स्पर्धा परिक्षेमध्ये कुमारी समीक्षा थोरात 45 किलो वजन गट, कुमारी अनुष्का आहेर 50 किलो वजन गट,कुमारी सोनाली नरोडे 57 किलो वजन गटात या तीन विद्यार्थीनींनी जिल्ह्यांत तिसरा क्रमांक मिळविला, तसेच दि. 6 ऑक्टोबर रोजी 14 वर्षे वयोगटातील व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धा पार पडल्या त्यात 70 किलो वजन गटात एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आदित्य भेंडाळे याची जिल्ह्यात प्रथम व नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली तसेच जिल्ह्यात ७५ किलो वजन गटात ऋषिकेश चिने याचा तिसरा क्रमांक व 14 वर्षे आतील 50 किलो वजन गटात साईश धाकतोडे याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी


संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शुभांगीताई जाधव मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि,विद्यार्थ्यांनी खेळाबरोबरच शिक्षणातही पुढे जावे व स्वतः बरोबर शाळेचा नावलौकीक वाढवावा. त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य श्री अतुल निळकंठ सर म्हणाले कि, विद्यार्थ्यांचे खेळामुळे शारिरीक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते व मानसिक तणाव दूर होण्यास कशी मदत होते याचे महत्त्व पटवून सांगितले. त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक श्री निवृत्ती मुरडणार सर यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा जिद्दीने पेटून उठा असे आवाहन केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्राविण्य मिळवावे या उद्देशाने शाळेची क्रीडा शिक्षक रिटायर मिलिटरी अधिकारी श्री निवृत्ती मुरडणार सर यांनी विद्यार्थ्यांसाठी बॉक्सिंग सारखा खेळ शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली यासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करण्यात आले त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ ते दहा या वेळेत विशेष सराव करून घेतला जातो तसेच शाळा सुटल्यावर ही देखील सायंकाळी चार ते पाच यावेळी या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सराव करून घेतलं जात होता. एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांच्या कोचिंग साठी नावाजलेले कोच यांचे मार्गदर्शन देखील लाभल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा निश्चितच झाला आहे, मागील वर्षी देखील या शाळेचा एक विद्यार्थी राज्यस्तरावर खेळलेला असून यापुढे देखील शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरावर,देश पातळीवर चमकतील अशी अपेक्षा व्यक्त केली व यशस्वी विद्यार्थांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शाळेचे क्रीडा शिक्षक श्री निवृत्ती मुरडणार सर यांचाही शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

शाळेचे व यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांचे शहा व पंचक्रोशीतून तसेच सिन्नर तालुक्यातून कौतुक केले जात आहे. व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा मिळत आहे.

या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री अनिल चतुर, व श्री सुरेश पारधी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!