Homeकोपरगावकै.मोतीलालजी शिंगी यांच्या स्मरणार्थ धर्मार्थ मोफत दवाखाना सुरू

कै.मोतीलालजी शिंगी यांच्या स्मरणार्थ धर्मार्थ मोफत दवाखाना सुरू

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समितीच्यावतीने,आचार्य आनंदॠषी जी म सा यांच्या सहकार्याने गांधीनगर जवळील इंडोर गेम हाॅल जवळ धर्मार्थ मोफत दवाखाना सुरू करण्यात आला.याच ठिकाणी कै. मोतीलालजी शिंगी यांच्या स्मरणार्थ २१ऑक्टोंबर २०२४ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक महिन्याला महिन्यात दोनदा रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे होते.तसेच तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार मा. महेश सावंत यांनी ही भेट देऊन पाहणी केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल, बस आगार व्यवस्थापक बनकर हे उपस्थित होते.

प्रथम स्वागत व प्रास्ताविक मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले. तद्नंतर डॉ.विलास आचारी यांनी मंचची भुमिका विशद केली.सदर वेळी मुख्याधिकारी सुहास जगताप,काकासाहेब कोयटे यांनी जेष्ठ नागरिक सेवा मंचला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

समारंभासाठी मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,ऊत्तमभाई शहा, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी,सौ.शैलजा रोहोम,सुवालाल भंडारी, हभप जगन्नाथ महाराज थोरे, पेंटर दारुवाला,आशुतोष पटवर्धन, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी डि एस पवार,आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.शहा,डॉ.भोकरे,डॉ. धाडीवाल, डॉ.गंगवाल,डॉ.पवार,डॉ. सौ. सुषमा आचारी,सौ.संगीतताई मालकर, किराणा मर्चंटचे अध्यक्ष राजकुमार बंब,उद्योजक संजय भन्साळी, राष्ट्रवादीचे धरम बागरेचा, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी शिंगी परिवाराचा व उपस्थित मान्यवरांचा जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले व शेवटी जवाहर शेठ शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!