Homeकोपरगावकै.भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर आणि जेष्ठ नागरिक सेवा मंच...

कै.भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर आणि जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कै.भागचंद माणिकचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर आणि जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी अल्पदरात ( ३०रू ) व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तरी सर्व गरजू व्यक्तीसाठी अल्पदरात म्हणजे फक्त २२००रुपयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे,यामध्ये दोन दिवस राहण्यासह प्रवास, जेवण, १ महिन्याचे औषधे व भारतीय भिंग यांचा समावेश असेल.विशेष म्हणजे या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेंस करीता ठोळे उद्योग समूहाच्या वतीने कै. भागचंद माणिकचंद ठोळे यांचे स्मरणार्थ गरजु पाच व्यक्तींना प्रत्येकी ११०० रूपये मदत दिली / केली जाणार आहे.

तरी गरजु व्यक्तींनी येतांना सोबत आधार व रेशन कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर आणावे तसेच पहिले चालु असलेल्या गोळ्या / औषधे व डॉक्टरांचे रिपोर्ट सोबत घेऊन यावे व धर्मार्थ हॉस्पिटल,इंदडोअर गेम हॉल,गांधीनगर जवळ,जेष्ठ नागरीक सेवा मंच कार्यालय कोपरगाव येथे या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!