

मुख संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव : -युवाक्रांति पोलिस मित्र संघटना, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी यांचे आदेशान्वये नूतन पदाधिकारी निवड संपन्न झाली व राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते निवडीचे पत्रही देण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना म. कापडणीस,राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष गणेश आदमाने,राष्ट्रीय युवतीध्यक्ष जयश्रीताई आहिरे,राष्ट्रीय महिला संपर्क प्रमुख जयश्रीताई इंगळे, प्रदेशाध्यक्ष मधुकर म.आहिरे, महिला प्रदेशाध्यक्ष वंसुदाताई नाईक, युवक प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार, प्रदेश उपाध्यक्ष किरण वाघमारे,प्रदेश संपर्क प्रमुख भाऊसाहेब शेळके,प्रदेश सचिव राकेश वाघ व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण पदाधिकारी बैठक संपन्न झाली.
युवाक्रांति पोलिस मित्र संघटना ही एक सामाजिक संघटना असून, सामान्य जनतेवर होणारे अन्याय व अत्याचार विरुद्ध लढणारी आणि सामान्यांच्या प्रलंबित प्रंश्नाना वाचा फोडणारी संघटना म्हणजे युवा क्रांती पोलीस मित्र संघटना होय. संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. जनतेचे हित लक्षात घेऊन संघटना समाजातील जबाबदार व्यक्तींतींची निवड करून संघटनेमध्ये सदस्यत्व देते.वरिष्ठांच्या पूर्वपरवानगी व मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व सदस्य यांचे अथक परिश्रमांतून संघटना संपूर्ण भारत देशात काम करत आहे.
या संघटनेमध्ये प्रत्येकास एक वर्ष काम करण्याची संधी दिली जाते.दर एक वर्षांनी पदाधिकारी नियुक्ती जाहीर केली जाते.जो पदाधिकारी प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडतो व न्यायासाठी भांडतो व संघटना वाढीसाठी काम करतो अशा व्यक्तींना पदोन्नती दिली जाते तसेच कार्यक्षम सदस्य यांना पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते.
सदर बैठकीत सर्वानुमते नुतन निवडी जाहीर करण्यात आल्या.यामध्ये युवक जिल्हाध्यक्ष पदी विकास खळे,युवक तालुकाध्यक्ष पदी यशवंत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्षपदी विलास वैद्य, कोपरगाव तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी पत्रकार राजेंद्र तासकर, कोपरगांव तालुका सचिव पदी गणेश बागुल, तालुका संपर्क प्रमुखपदी सचिन कदम, कुंभारी शाखा प्रमुख पदी अमोल कोकाटे यांची एकमताने निवड करण्यात आली.
युवाक्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वरील सर्व पदाधिकारी निवडीबद्दल, सर्वांवर पंचक्रोशीसह देशभरातून सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.