
मुख्य संपादक राजेंद्र तासकर
कोपरगाव :- कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस सात किमी अंतरावर असलेल्या कुंभारी येथील ग्रामीण बहुउद्देशिय प्रतिष्ठान संचलित युगंधर इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांचा अनेक गाण्यांच्या तालावर ठेका धरतं उपस्थितांना मंत्रमुग्ध करतं दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले

सदर कार्यक्रम राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती प.पु. श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व वनराई कृषी उद्योग समुह गोधेगावचे मा. श्री. आबासाहेब भोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुभेदार होन, कल्याणराव होन, डॉ.जी.एस रोकडे पोलीस पाटील, श्रीमती सिंधुबाई आहेर,नानासाहेब थोरात, डॉ. सुयोग पवार, दिगंबर पांडुरंग कदम यांच्या उपस्थितीत राघवेश्वरानंदगिरीजी महाराजांच्या समवेत अध्यक्षांच्या हस्ते प्रथम विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

खेडेगावामध्ये दर्जेदार शिक्षण घेऊन उद्याची सुसंस्कृत व गुणवतापूर्वक पिढी घडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित युगंधर इंग्लिश मिडीयम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मान.रमण यादव गायकवाड यांनी दिनांक 11 नोव्हेंबर 2013 रोजी आपल्या गावासह आजूबाजूच्या गावातील बालगोपालांना गेल्या तेरा वर्षापासून ज्ञानामृताचे धडे देत असल्याचे गोरोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब भोकरे साहेब

यांनी काढले. तर राघवेश्वरानंदनगिरी जी महाराज यांनी लहान मुलांसी संवाद साधत त्यांच्यावर आशिर्वादाचा वर्षाव केला. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव मिळावी म्हणून अनेकविध उपक्रमासह दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे संस्थेचे चेअरमन रमण गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकास सांगितले.

यावेळी सुकदेव राऊत, रोहिणी घाटोळे,रंजना गायकवाड, प्रियंका आहेर, निलेश गायकवाड, यशवंत गायकवाड, भास्कर सुरे यांसह धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंद,माता -भगिनी, मुले -मुली, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित साकार करण्यात आला. तर शेवटी आभार शिक्षिका चंदनशिव मॅडम यांनी मानले.