Homeकोपरगाव….यांची कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड

….यांची कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड

कोपरगाव ता. १ एप्रिल : – श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्कुल कमिटी सदस्य बालरोग तज्ञ डॉ. अमोल जयकुमार अजमेरे यांची नुकतीच कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड जाहिर झाली आहे.

या निवडीबद्दल डाॅ.अमोल अजमेरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांनी २००५ मध्ये कोपरगांव शहरात प्रॅक्टिस सुरु केली.ऊस तोड कामगार यांचे आरोग्यविषयक समस्या सोडण्यास ते विशेष प्रयत्नशिल असतात. ग्रामीण रुग्णालयात देखिल ते सेवा देण्यात अग्रेसर असतात.काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगांव शहरात सर्व सोयीयुक्त रुग्णालय सुरु केलेले आहे.

कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन श्री.चंद्रकांत ठोळे,श्री.संदीप अजमेरे, आनंद ठोळे,राजेश ठोळे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, दिलीप तुपसैंदर, उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक अनिल अमृतकर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, श्रीमान गोकुळचंदजी परीवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!