Homeकोपरगावतालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी आधुनिक सुरक्षा उपाय योजनांचे आवाहन – व्यापारी महासंघाचा पुढाकार

तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी आधुनिक सुरक्षा उपाय योजनांचे आवाहन – व्यापारी महासंघाचा पुढाकार

कोपरगाव🪐25 एप्रिल – कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश देत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी एक ठोस पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना “विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेस” चे आधुनिक सुरक्षा उपकरण ” आपल्या दुकानांमध्ये बसवून चोरी होण्यापासून सुटका मिळू शकते.

या उपकरणांचा उपयोग केवळ चोरी रोखण्यासाठी नव्हे, तर व्यवसाय आणि मालमत्तेची सर्वांगीण सुरक्षा करण्यासाठी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुकानांचे संपूर्ण नियंत्रण व्यापाऱ्यांच्या हातात राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

“व्यवसायाचे संरक्षण हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक व्यापाऱ्याने पुढे येऊन हे उपकरण बसवावे,” असे आवाहन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी यावेळी केले.सदरचे अत्याधुनिक उपकरण आपल्याला बसवायचे असल्यास अधिक माहितीसाठी श्रद्धा कॉम्प्लेक्स धारणगाव रोड कोपरगाव या कार्यालयात अथवा 9527424740 व 8007077307 या नंबर वर संपर्क साधावा असेही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी शेवटी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!