Homeकोपरगावसाहित्यिक विश्वातील एक अवलिया

साहित्यिक विश्वातील एक अवलिया

कोपरगाव : – “असेल आवडं तर मिळेल सवडं ” या उक्तीप्रमाणे अहिल्यानगर येथील एम आय डी सी मध्ये रात्रपाळीचे काम करुन, स्वखर्चाने दिवसभर आपल्या स्कुटरवर फिरून संपूर्ण जिल्ह्यातील लेखकांची पुस्तके, माहिती जमा करून यापूर्वी फक्त नाव पत्ता प्रकाशित करून आणि तदनंतर प्रकाशित साहित्याचे संदर्भात दिर्घ ग्रंथ तयार करणारा माणूस निराळाच म्हणावा लागेल. पायाला भिंगरी बांधून फिरायचे, साहित्यिकांच्या प्रत्यक्ष भेटी घ्यायच्या आणि ग्रंथ संकलित करून अभ्यासकांना उपयुक्त होईल अशी “अहमदनगर साहित्यिक वैभव (साहित्यिक व साहित्य ) सूची” तयार करून पुन्हा तिच्या वितरणासाठी दिवसभर फिरायचे हा एक या माणसाला लागलेला आगळावेगळा छंद होय. आणि म्हणूनच जुनी पिढीची माणसं म्हणायची असेलं आवडं तर मिळेल सवडं हेच खरं.

या साहित्यिकाने जेवढे मिळतील तेवढे संदर्भ जमा केले आहेत. खंत फक्त एकच आहे नाटकाच्या संहिता फारशा मिळाल्या नाहीत.असो, जी साहित्यिक सूची तयार झाली आहे ती नक्कीच प्रशंसनीय व अभिनंदनीय बाब आहे यात शंकाच नाही.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरुन लेखकांच्या प्रकाशित पुस्तकांची सर्व माहितीसह १३६४ पानांची सुची ( संदर्भ ग्रंथ ) तयार करणारे शब्बीर बिलाल शेख हे कोपरगाव येथे आले असता त्यांनी चंद्रमा कलर फोटोचे हेमचंद्र भवर यांच्या शाखेस भेट दिली असता, त्यांचे स्वागत करण्यात आले व ” नामदेवरावजी परजणे ” (आण्णा ) यांचे ” विचारमंथन ” पुस्तके भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर त्यांनी कोपरगाव नगरपालिका सार्वजनिक वाचनालयास, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती संचलित एन.पी. पी. लाॅ काॅलेज येथे भेट दिली. असता,महाराष्ट्र साहित्य परिषद कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. हिरालाल महानुभाव यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन,धवल क्रांतीचा योद्धा हा ग्रंथ व सन्मानचिन्ह भेट देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी प्रा. राजेंद्र साळुंके, डि. के. भाटे आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!