Homeकोपरगावसंजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलने 100% निकालाची 35 वर्षाची परंपरा कायम राखली !!

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलने 100% निकालाची 35 वर्षाची परंपरा कायम राखली !!

कोपरगाव : – कोपरगाव तालुक्यातील इंग्लिश मिडियम स्कूलपैकी, निव्वळ तालुक्यातच नव्हे तर तालुक्याबाहेर सुद्धा एक आदर्श नावलौकिक असणारे कोपरगांव येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल! सन. 2024 / 25 मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेत या शाळेने घवघवीत यश संपादन केले असून, 100% निकालाची 35 वर्षाची परंपरा कायम राखली आहे.

या शाळेतील 6 विद्यार्थी Miss.Jodha.Ravina. Tanesingh 94.80% (1st) ; Miss. Mahale. Shravani. Ranjit. 93.80%(2nd) ; Miss. Kolhe. Samrudhi. Sandeep. 91.60% (3rd) ; Miss. Walte. Aditi. Machindra. 91.20(4th) ; Miss. Pote. Siddhi. Anil. 90.60 ( 5th) ; Miss. Priyal. Sachin .Lokhande 90.40% (6th) हे विशेष गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवून यशस्वी झाले आहेत. यावर्षी 47 विद्यार्थ्यांनी एस एस सी परिक्षा दिली. त्यातील सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब,प्रथम महिला आमदार मा.सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे साहेब,सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब, शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी मा. सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे साहेब, सर्व मॅनेजिंग कमिटी सदस्य, शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर प्राचार्य मोहरिन शेख सर, दहावी वर्गाचे आदर्श वर्गशिक्षक श्री. दीपक बोळींज सर, कैलास बहिरट सर, अनुप गिरमे सर, नितीन उगले सर, तेजस गायकवाड सर, सौ. गायत्री गाडे मॅडम, सौ दरेकर मॅडम, सौ. सुराळकर मॅडम, सौ. जयश्री पवार मॅडम, श्री. विशाल परजणे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी शाळेच्या या भरघोस यशाबद्दल मनापासून अभिनंदन केले.

या दैदिप्यमान यशामुळे शाळेचा स्तर अधिक उंचावला असून शाळेत नवीन प्रवेशासाठी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुनं ते सोनं! याप्रमाणे आता पुन्हा एकदा ही शाळा नेत्रदीपक प्रगतीकडे गरुडझेप घेत उद्दीष्ट साध्य करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!