Homeकोपरगावया महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र व संगणक विज्ञान विभागाच्या पदव्यूत्तर वर्गांना शासनाची मान्यता

या महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र व संगणक विज्ञान विभागाच्या पदव्यूत्तर वर्गांना शासनाची मान्यता

कोपरगाव : – रयत शिक्षण संस्थेचे श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स ॲन्ड संजिवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील प्राणी शास्त्र व संगणक विज्ञान विभागाच्या पदव्यूत्तर वर्गाला मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली.

विद्यापीठांच्या शिफारशीच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेल्या छाननीनुसार पात्र ठरलेल्या प्रस्तावांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (४) (घ) नुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमांना मंजूरी देण्यात आली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना डॉ. सरोदे यांनी सांगितले की, उपरोक्त अभ्यासक्रम हे दोन वर्षाचे आहेत. यासाठी प्राणीशास्त्र व संगणक विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी २४ व ३० अशी विद्यार्थी संख्या निर्धारित आहे. या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे.

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती ठेवून अत्यंत माफक फी मध्ये वरील अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अलीकडच्या काळातील तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव व त्यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी उद्देश मध्यवर्ती ठेवून महाविद्यालयात सुरू झालेल्या या अभ्यासक्रमासाठी कोपरगाव तालुका व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अँड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!