Homeकोपरगावस्थानिक स्वराज्य संस्था, कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग ५% व मागासवर्गीय १५% निधीचे...

स्थानिक स्वराज्य संस्था, कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग ५% व मागासवर्गीय १५% निधीचे वाटप उत्साहास संपन्न

कोपरगाव : – स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या स्व उत्पन्नातून ५ % दिव्यांग कल्याण निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणार्थ खर्ध करणे बंधनकारक असल्याने शासन निर्णयास अधिन राहुन सामाजिक बांधिलकी जपत कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुंभारी येथे लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. देवयानी घुले व उपसरपंच सौ. कविता निळकंठ व सर्व संचालक मंडळाने ग्राम अधिकारी श्री.कहार साहेब यांच्या सुचने नुसार सन २०२३/ २४ वर्षाच्या ५ % निधी अंतर्गत बापूसाहेब वारूळे, कृष्ण काशिद,ऋषिकेश वाघ, रेखा शेजवळ, शशिकांत इंदरर्खे, कृष्णा भारती अशा एकूण ६ दिव्यांग लाभार्थ्यांना वस्तु रुपी २५०० रुपये किमतीचे स्टँड फॅन तसेच माधव चंदनशिव, सिताबाई चव्हाण, संगिता चंदनशिव, नाना शेजवळ, बाळासाहेब चंदनशिव, दगु चंदनशिव, शोभा जाधव, दादाराम खैरनार, बारकु शेजवळ, दशरथ चंदनशिव, लहानुबाई शेजवळ, रामभाऊ चंदनशिव, बाळु गायकवाड अशा एकूण १५ मागासवर्गीय कुटुंबास प्रत्येकी १००० रुपये किमतीचे मागासवर्गीय कल्याण १५ % निधीअंतर्गत किराणा किटचे गावचे जेष्ठ नागरिक श्रीधर आप्पा कदम यांच्या हस्ते दि.२८ जून २०२५ रोजी नुकतेच वाटप करण्यात आले.

यावेळी गावचे जेष्ठ नागरिक श्रीधर आप्पा कदम, लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. देवयानी घुले, उपसरपंच सौ. कविता निळकंठ, सदस्य दिलिप ठाणगे, रामराव चंदनशिव, राहुल पवार ,संजय ठाणगे, अनिकेत कदम, ग्रा. सद‌स्या – ज्योती आहिरे, रंजना गायकवाड, मनिषा घुले, वैशाली बढे, रंजना वारुळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले, माजी. सरपंच अर्जुनराव घुले, चंद्रभान बढे, भानुदास घुले, वसंत घुले, ललित निळकंठ, विकास वाघ, पुरुषोत्तम महाजन, भास्कर भारती, कारभारी व्हरे, अभिजित चकोर, सिद्धांत घुले, आदित्य महाजन, ग्रामअधिकारी कहार साहेब, कर्मचारी निता कदम, रवींद्र व्हरे , शंकर चंदनशिव यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, लाभार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी लाभार्थी वर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहतांनाचे चित्र पाहावयास मिळत होते. लाभधारकांनी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सचिव, सदस्य, व कर्मचारी यांचे शेवटी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!