Homeकोपरगावएकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोपरगाव : – “विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला मायबापा “ या अभंगातील ओळी साक्षात सत्यात उतरल्या. जगद्गुरु चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त सचिन दादा पवार व अर्जुन साळुंके या दोन प्रतिभावंत युवकांनी एकल महिलांच्या मुलांना सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याची मदत वस्तू रूपात दिली.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की,साक्षात आषाढी वारीला निघालेल्या पांडुरंगाचे ही मदत या निराधार मुलांना केली. दिवसभर मोलमजुरी करून आलेला पैसा,पदरी दोन-तीन मुलं, न झेपवणारा शिक्षणाचा खर्च शाळेची फीज युनिफॉर्म बाकी इतर सर्वच गोष्टी मिळवण्यासाठी या माऊलीची धडपड चालू असते पण आठवडे ला मिळणारा पगार पुरता पडत नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची वाटप होत असते. परंतु, यावर्षी पांडुरंगाच्या रूपात एकच दाता मिळाला की त्या दात्याने जवळपास 113 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली. व प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग, टिफिन,पाणी बॉटल, एक डझन वही व कंपास बॉक्स असे साहित्य वाटप केले. त्यामुळे एकल महिलांच्या चेहऱ्यावर व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

आदरणीय हेरंब कुलकर्णी एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य निमंत्रक व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा कुलकर्णी यांच्या हातून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजुभाऊ बंब, जवाहर शहा, उत्तम भाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात असे दातृत्व दाखविणारे तरुण खूपच बोटावर मोजण्या इतके आहे. सचिन पवार व अर्जुन साळुंखे यांच्या दातृत्वाला सलाम. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मुळे यांनी केले व आभार श्रद्धा शिंदे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!