Homeकोपरगावआभार श्रद्धामय योगदानाचे - संगीता मालकर

आभार श्रद्धामय योगदानाचे – संगीता मालकर

कोपरगाव : – “काय द्यावे त्यांसी I व्हावे उतराई,ठेविता हा पायी जीव थोडा ॥ जगद्गुरु संत तुकारामांच्या या वचनाप्रमाणे ह.भ.प सचिन महाराज पवार यांनी एकल महिलांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून असंख्य विधवा निराधार परिततयक्ता एकल महिलांसाठी विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या मार्फत राबवले जातात. या महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी पालकत्व संवेदनशील मनाचे, दानशूर व्यक्ती शोधून त्यांच्याकडे दिली जाते.. यावर्षी साक्षात पांडुरंगाच्या रूपाने ह.भ.प पवार महाराज. यांनी सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानला मदतीचा हात दिला. सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकल महिलांच्या मेळाव्याचे आयोजन लायन्स पार्क या ठिकाणी करण्यात आले होते.

त्यावेळी एकल महिलांच्या शंभरहून अधिक मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. याप्रसंगी संगीता मालकर म्हणाल्या की कोणतेही पिढी जात श्रीमंती नसताना स्वकर्तुत्वावर उच्च शिक्षण घेऊन कीर्तन प्रवचना सारख्या समाजप्रबोधनाच्या पवित्र कार्यातून मिळालेला एक एक पैसा सत्कारणी लागावा. या विद्यार्थ्यांच्या मन बुद्धी वाणीवर संस्कार करून सुजाण नागरिक शिक्षणातून घडावा अशी आंतरिक तळमळ महाराजांची आहे. आजच्या काळात पैशासाठी धावणारे, पैशासाठी नात्यांची ताटातूट करणारे, पैशासाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या आजच्या कलियुगात माणसांमध्ये देव पाहणारे हे व्यक्तिमत्व. समाजाच्या कल्याणासाठी समर्पणाचा भाव, आपल्या कमाईचा काही भाग समाजाचे ऋण परत करण्यासाठी ची धडपड, आपल्याला जे मिळाले ते कुठल्याही अपेक्षाशिवाय दुसऱ्याला देणे अशी त्यांची धारणा. हे सात्विक दान साक्षात पांडुरंगाच्या रूपाने आमच्या एकल भगिनींच्या मुलांचे संवेदनशील पालकत्व स्वीकारून केले. अशा दातृत्व पुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त आठ प्रकारच्या कडधान्याचे वाटप महिलांना प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती आचार्य अर्जुन साळुंखे,ठोंबरे काका गीता ताई रासकर, छाया गिरमे,स्मिता पोळ, अर्चना पाटील,स्वाती काळे , स्वाती गीते,नंदिनी पाटील उपस्थित होत्या. आभार स्वाती गीते यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!