Homeकोपरगाव… यांची व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार

… यांची व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार

कोपरगाव :- सहकारातून समृद्धीकडे जातांना जनतेचे हित जोपासण्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या सहकारी बँकापैकी एक स्वतःची नावलौकीक व प्रतिष्ठा जपलेली,शहरातच्या अग्रभागी स्थीत असलेल्या स्वर्गीय माजी. सहकारमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ठायी असलेल्या दुरदृष्टीतून साकारलेल्या ” साई संजीवनी सहकारी बँकेच्या ” व्हाईस चेअरमन पदी श्री.सुरेशराव मारुतराव जाधव साहेब यांची निवड झाल्याबद्दल संवत्सर येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री.ज्ञानेश्वर बापु परजणे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.राजेंद्रजी परजणे तसेच भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे, व संवत्सर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री.महेश परजणे यांच्या शुभ हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री.ज्ञानेश्वर बापु परजणे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्रजी परजणे, तसेच भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे, व संवत्सर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री. महेश परजणे, श्री. दीनेश बोरनारे, श्री. राजेंद्र बोरनारे, श्री. मोहन निकम साहेब, श्री. योगेश परजणे,.श्री. गणेश साबळे, श्री. संदीप मैंद, श्री. संचिन शेटे, श्री. राजेंद्र सांगळे, श्री. प्रभाकर भाकरे, श्री. अनिल भाकरे, श्री. चिमाजी दैने, चि. हेमंत मुकुंदमामा काळे व संजीवनी कारखाना पीए विभागातील श्री. गणेश कोताडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्कारमुर्ती श्री.जाधव साहेब सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब, माजी. प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि युवा नेते मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब या संपूर्ण कोल्हे परिवाराने आमच्यावर नेहमी विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या सोपवून त्या पूर्णही करून घेतल्या त्याच अनुसंगाने आज आमच्यावर सोपावलेली हि जबाबदारी सुद्धा आम्ही तितक्याच विश्वासाने पूर्णत्वास नेण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करु त्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याबरोबरच आशिर्वादाची गरज आहे आणि ती मिळेलच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल आम्हीं सदैव ॠनी राहु. शेवटी उपस्थितांचे आभार श्री.मुकुंद मामा काळे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!