
कोपरगाव:- कोपरगांव शहरातील कलाकार सागर रामभाऊ त्रिभुवन यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पहाट फाउंडेशनच्यावतींने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श मॉडेल पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच प्रदान करण्यांत आला. सागर हे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहुजी सेनेचे शरद त्रिभुवन यांचे बंधु आहेत.
सागर त्रिभुवन यांना यापुर्वी याच वर्षात बाबासाहेब बागमार ग्रँड आयकॉन, आंतरराष्ट्रीय फॅशन शो सम्राट समाजरत्न व अहिल्यानगर येथे वीर शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यांत आलेले आहे.
पहाट फाऊंडेशनचे संचालक अमोल भिलंगे, अर्पिता सुरडकर, सोमनाथ चौधरी व त्यांच्या सहका-यांनी सागर त्रिभुवन यांच्या कलेचा गौरव केला. त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल सागर यांचे सर्व थरातुन कौतुक होत आहे. सागर त्रिभुवन यांनी हे सर्व पुरस्कार लहुजी वस्ताद व जनतेच्या चरणी अर्पीत केले.