Homeराहुरीक्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप...

क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून “शाळा पूर्व तयारी ” मेळावा संपन्न!!

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर
राहुरी नगरपालिकेच्या नूतन मराठी शाळा नं 08 पिंपळाचा मळा,येथे ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.बाळासाहेब तनपुरे,अमोल कटारे,दादासाहेब माळी,सर्व माता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले.
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हराळ मॅडम यांनी शाळापूर्व तयारी मेळावा का साजरा करायचा? याचे महत्त्व सांगून केले.
यावेळी गावामध्ये ट्रॅक्टर मधुन ढोल,लेझीम पथकासह जनजागृती फेरी काढण्यात आली.यात श्री योगेश कटारे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले

. उपस्थित दाखल पात्र विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शाळेच्या शिक्षिका हराळ यांनी सूत्रसंचालन केले.श्री राठोड सर,सौ हराळ मॅडम यांनी नाव नोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास,गणन पूर्वतयारी असे सात स्टॉल लावून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हराळ मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीविषयी सांगितले व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.श्री राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले.विद्यार्थिनींना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!