Homeकोपरगावम. गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

म. गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

कोपरगाव: – रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे शनिवार दिनांक २९/११/२०२५ रोजी ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ जळगाव यांच्यामार्फत घेण्यात येणारी “गांधी विचार संस्कार परीक्षा २०२५” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. सदर परीक्षेला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समृद्ध विचारांचा वसा – वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात आलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. एक संवेदनशील राष्ट्रप्रेमी व जागरूक व्यक्ती निर्माण करण्याचा पाया गांधी विचारांवर आधारित असून शालेय विद्यार्थ्यांसह तरुण पिढीसाठीही तो तितकाच महत्वपूर्ण ठरतो आहे. २००७ पासून घेण्यात येणाऱ्या गांधी विचार संस्कार परीक्षेला (जी.व्ही.एस. पी.) मिळणारा प्रतिसाद या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित करणारा आहे. व्यक्ती निर्माणाद्वारे समाज परिवर्तनासोबत राष्ट्र उभारणीचे हे कार्य असून गेल्या १६ वर्षात भारतातील व अन्य देशातील २१ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व हजारो कैद्यांनी या परीक्षेद्वारे गांधी विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील श्री स. गं. म. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे व ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. शिंदे एस. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य व निकोप वातावरणात ‘महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा’ संपन्न झाली.

सदर परीक्षा पार पाडण्यासाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन प्रा. श्री. रेवगडे एम.डी. यांच्यासह अनेकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. त्यात सुपरवायझर प्रा. कळमकर इ.जी., ज्युनिअर कला विभाग प्रमुख श्रीमती देशमुख के. ए, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. वाघ बी. एम. विज्ञान विभाग प्रमुख प्रा. गोराणे ए. सी., कार्यालयीन अधिक्षक श्री. सुनील गोसावी व कमिटीतील सदस्य प्रा. शेळके के. जे, प्रा. घाडगे आर.ए, प्रा. श्रीमती गवारे एस. एस, प्रा. सोनोने एस. एस, प्रा. सौ शेंडगे जे.बी, प्रा. खताळ एम.पी, प्रा. सोनवणे एस. डी, प्रा. तुरकणे के. व्ही. या सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!