Homeकोपरगाववसंतदादा मल्टीस्टेट सोसायटीच्या अनेकविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा - हेमचंद्र भवर

वसंतदादा मल्टीस्टेट सोसायटीच्या अनेकविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा – हेमचंद्र भवर

दिनदर्शिकेचे विमोचन समारंभ

कोपरगाव – शहरातील गुरूद्वारा रोड वरील वसंतदादा मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने ग्राहक हितासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू झाली आहे पाच लाखांपर्यंत ठेव सुरक्षा गोल्ड लोन सुविधा वाहन कर्ज अल्प मुदतीचे कर्ज तारण कर्ज कयू आर कोड ऑनलाईन पेमेंट ट्रान्स्फर आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी शाखेशी संपर्क साधावा असे मनोगत साहित्यिक, छायाचित्रकार, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेचे प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले.

विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे तपपूर्तीकडे वाटचाल करणारी गुरूद्वारा रोड वरील वसंतदादा मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने ग्राहक हितचिंतक सभासदांच्या
सोयीसुविधा माहितीसाठी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले यात तिथी सण समारंभ आणि सोसायटीच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली असून सदरची दिनदर्शिका प्रत्येक घरात असावी असे विचार हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापिका सौ अनुराधा रणदिवे यांनी उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे कर्मचारी धनंजय खरात यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!