
कोपरगाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमेश भारत शिंदे याने केले तर कार्तिकी विश्वनाथ गायके यानी अध्यक्षपदाची सूचना मांडली आणि तेजल रावसाहेब पगारे हिने अनुमोदन दिले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते महेंद्र बाळासाहेब मैंद यांची निवड करण्यात आली तद्नंतर रेणुका शेळके, अनुष्का खिलारी यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.
संत गाडगे महाराजांच्या कार्याबद्दल शिक्षक रावसाहेब लहरे, विवेक तळपे, बाळासाहेब गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
शाळेचे मुख्याध्यापक सुनील टोरपे सर यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी तिळवणी येथील सद्गुरु संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू वाघ बाबा यांनी सर्व विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून खाऊचे वाटप केले. या पुण्यतिथी निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या, गावाच्या, शालेय, परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारली संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन केले.