Homeकोपरगावसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने कविता वाचन समारंभ

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने कविता वाचन समारंभ

कोपरगाव – शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने शनिवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
कविता वाचन समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे परिषदेच्या अध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्षमी सातभाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शाळा महाविद्यालयीन साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी केले आहे

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने नवोदित लेखकांना प्रोत्साहन मार्गदर्शन करताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मदतीचा हात दिला जातो आहे म्हणून तालुक्यातील सर्व नवोदित लेखकांना व साहित्यिकांनी कविता वाचनाची संधी साधन्यासाठी शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता स्व. र म. परिख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालय इनडोअर गेम्स हाॅल येथे उपस्थित रहावे असे परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!