
कोपरगाव :- कॅलेंडर प्रमाणे १ जानेवारी पासून नवीन वर्ष सुरु होते आणि या नवीन वर्षातील मकर संक्रात हा पहिला सण असतो, मकर संक्रात म्हटले की, स्रीयांच्या आनंदाला पारावार उरत नाही या सणाला भारतीय संस्कृती मध्ये अनन्य साधारण महत्व असते, भौगोलिक दृष्टया सुर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन तीळ – तीळ रात्र लहान होत जाऊन दिवस तीळ – तीळ मोठा होत जातो म्हणूनच मकर संक्रांती च्या दिवशी तीळ युक्त पदार्थ देवाण घेवाण करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीने जपली आहे, त्यात महिला – भगिणी वेगवेगळे गृह उपयोगी वस्तु चे वाणं म्हणून वाटप करतात त्याचबरोबर याच दिवशी अनेक ठिकाणी आकाशात उंच – उंच पतंग उडवून आनंद लुटला जातो त्याला वयाचे बंधन नसते, हा आनंद व्दीगुणीत करण्याचा व बाल गोपालांच्या आनंदात आनंद शोधण्याचे कार्य तालुक्यातील कुंभारी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बाल गोपालांना पतंगाचे वाटप करत व माता-भगिनींनी हळदी कुंकवासह वाणं वाटप करतं मोठया उत्साहात साजरा केला.


प्रारंभी अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महिलांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार माणिकराव उगले व पत्रकार राजेंद्रजी तासकर हे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार माणिकराव उगले यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमण यादव गायकवाड यांनी केले तर अध्यक्ष स्थानावरून बोलतांना पत्रकार उगले साहेब म्हणाले कि, दिवसेंदिवस डिजीटल युगामध्ये झपाट्याने वाढ होत असून वाचकांचा वाचनाचा दर्जा घसरत चालला असल्याची खंत व्यक्त केली. वाचन संस्कृती टिकविण्यासह वाचक वर्ग आकर्षित करण्यासाठी अनेक विध उपक्रमांतर्गंत वाचनालयाचे अध्यक्षांसह सर्वच नेहमी प्रयत्नशील असतात.त्यांच्या प्रयत्नांना नेहमी पाठबळ देण्याचे काम आम्ही पत्रकार बांधव करत असतो.
सदर प्रसंगी जेष्ठ पत्रकार माणिकराव उगले, पत्रकार राजेंद्रजी तासकर, परीट धोबी सेवा मंडळाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष दीपकजी वाघ, पोलीस मित्र संघटना जिल्हाध्यक्ष विकास खळे, कुंभारी ग्रामपंचायत सदस्य रामराव चंदनशिव, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे नितीन मोहरे, सदाशिव पवार, भारत पगारे, भाऊसाहेब पवार, सौ रंजना गायकवाड, कल्याणी माळी, शंकर चंदनशिव यांसह आदी महिला, बालगोपाल, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री रमण गायकवाड यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार माणिकराव उगले व राजेंद्रजी तासकर यांचा व आलेल्या सर्वच मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व मान्यवरांच्या हस्ते गावातील बालगोपालांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत पतंग व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे शेवटी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सचिव यशवंत गायकवाड यांनी मानले.