Homeकोपरगावसेवालाल महाराज पर्यावरणाचे रक्षक - ज्ञानेश्वर परजणे

सेवालाल महाराज पर्यावरणाचे रक्षक – ज्ञानेश्वर परजणे

कोपरगाव : – महिलांचा सन्मान करा, एकमेकांशी प्रेमाने वागा, जंगल तोडु नका, पर्यावरणाचे रक्षण करा या संदेशातुन जय सेवालाल महाराजांनी जनजागृती करत बंजारा समाजाच्या विकासात मोठे योगदान दिले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी केले.

तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली बंजारा समाजाचे आराध्यदैवत जय सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी प्रास्तविक केले. उपशेतकी अधिकारी चंद्रकांत वल्टे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

श्री.ज्ञानेश्वर परजणे पुढे म्हणाले की, मनुष्य भावनेच्या आहरी जावुन अंधश्रध्देवर मोठ्या प्रमाणांत विश्वास ठेवतो. उसतोडणी कामगार अशिक्षीत असुन त्यांच्यातील अज्ञान दूर करण्यासाठी जय सेवालाल महाराजांनी मोठे काम केलेले आहे. संकटात सापडलेल्या भक्तांना सन्मार्ग दाखवत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर जय सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूध्द मोठा लढा दिला. संत सेवालाल महाराजांनी मानवता, पर्यावरण रक्षण, गोरक्षण यावर सातत्याने आवाज उठविला. बंजारा समाजातील सर्व उसतोडणी कामगारांनी सेवालाल महाराज आराध्यदैवताचा नेहमीच सन्मान करावा. कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे हे सर्व उसतोडणी कामगारांच्या अडी अडचणी सोडवुन त्यावर मार्ग काढतात, उस गाळप हंगामात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात, त्यांची मोफत आरोग्य तपासणी करतात, उसतोडणी कामगारांच्या मुला मुलींना थळातच शैक्षणिक सुविधा निर्माण करतात, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे असेही ते शेवटी म्हणांले.

याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, शेतकी विभागाचे सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उप शेतकी अधिकारी चंद्रकांत वल्टे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!