Homeकोपरगाव"यशस्वी उद्योजक” उपक्रमात कोपरगावच्या कन्या डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांना ‘मेंटॉर ऑफ...

“यशस्वी उद्योजक” उपक्रमात कोपरगावच्या कन्या डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांना ‘मेंटॉर ऑफ द मंथ’ सन्मान.

कोपरगाव :- पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडच्या दे-आसरा फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “यशस्वी उद्योजक” या महत्त्वाकांक्षी उपक्रमात कोपरगाव येथील डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांची “मेंटॉर ऑफ द मंथ” म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे उद्योजकतेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, नवउद्योजकांसाठी ही एक प्रेरणादायी बाब ठरली आहे.

डॉ. नेने यांच्या मार्गदर्शनाखाली “AI for Business” (उद्योग व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयावर आधारित पहिला मार्गदर्शक व्हिडिओ नुकताच प्रसारित करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवसायात कसा प्रभावी व परिणामकारक वापर करता येईल, याबाबत या व्हिडिओत सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले आहे.

“यशस्वी उद्योजक” या उपक्रमाच्या माध्यमातून नवउद्योजकांना योग्य दिशा, तंत्रज्ञानाची जाण आणि आत्मविश्वास देण्याचे कार्य दे-आसरा फाउंडेशन करत असून, डॉ. मनिषा नेने यांचा सहभाग या उपक्रमाला नवी उंची देणारा ठरत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि दृष्टीकोनाचा लाभ अनेक उद्योजकांना होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!