
कोपरगाव :- राज्यातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, राज्यस्तरीय १७ वी सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिर्डी येथे गोल्डन क्रिकेट अँकडमी व के. पी. क्रिकेट अँकडमी च्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्धाटन साई निर्माण समुहाचे प्रमुख श्री. विजय कोते यांचे हस्ते झाले.

या स्पर्धा महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या आहे. या स्पर्धेमधून राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन सचिव राजेंद्र इखणकर यांनी सांगितले की, “राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.”
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव तथा अहिल्यानगर जिल्हा सचिव श्री. मकरंद को-हाळकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरुण चंद्रे यांनी राज्यातील सर्व संघांनी सक्रिय सहभाग नोंदवुन सहभागी झाल्याबद्दल कौतुक करुन धन्यवाद दिले.
साईबाबाच्या पावनभुमीत या स्पर्धा होत असुन त्यामुळे या खेळाचे पुढील वाटचाल उज्वल आहे. सर्व खेळाडुनी साईबाबाचा श्रध्दा व सबुरी हा मुलमंत्र आचरणात आणावा असे उद्घाटक विजय कोते यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी, सह सचिव कल्पेश भागवत सर, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन तसेच रिझवान पठाण, प्रा. सुनिल कुटेसर, उमेश वाघोले, कन्हैया गांगुले, अक्षय आव्हाड, आशिष मेहेत्रे, शमित माळी आणि प्रवीण मुंगसे, सोमनाथ सपकाळ, युवराज मांडकर, गणेश गायकवाड आदिंनी विशेष परीश्रम घेत आहेत. या स्पर्धात एकुण २० मुलांचे व१८ मुलीचे संघ सहभागी झाले आहेत.
या प्रसंगी महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. इंद्रजित नितीनवार, सोलापुरचे संतोष खेंडे, पंच कमिटीचे प्रमुख आनंदा कांबळे, अजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे शिर्डी येथे क्रीडामय वातावरण निर्माण होणार असून, बेसबॉल या खेळाला राज्यात अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.