Homeकोपरगाववाढणारं वय जबाबदारीची जाणीव करून देतं - विजय बंब

वाढणारं वय जबाबदारीची जाणीव करून देतं – विजय बंब

कोपरगाव – नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे वाढदिवस दरवर्षी साजरा होतो परंतु सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा लढण्याचे बळ देतात,जगण्याची प्रेरणा देतात आणि वाढत्या वयानुसार जबाबदारीची जाणीव होते असे विचार जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी व्यक्त केले.

शैक्षणिक, व्यावसायीक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांच्या कार्याचा वसा घेऊन नेहमीच जेष्ठ नागरिकांसाठी, समाजातील गोरगरीबांसाठी, गरीब गरजू शालेय विद्यार्थींचया मदतीसाठी धावून येणाऱ्या जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांचा वाढदिवस साधुसंतांचया आशीर्वादाने शहरातील अनेक मान्यवर, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन साजरा केला. वर्षभर अनेकांचा वाढदिवस साजरा करणारे जेष्ठ नागरिक सेवा मंच, अनेकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे जाणून अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

संजीवनी उद्योग समुहाचे नितीनदादा कोल्हे, उद्योजक कैलास ठोळे, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संचालक मंडळ, अभियंता नाईक यांच्यासह महंत रमेशगिरीजी महाराज, कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनीही शुभेच्छा देऊन जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या कार्याचा गौरव केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!