Homeकोपरगावआत्मा मालिक’चा मंगेश कदम ऑलिंपियाड चॅम्पियन

आत्मा मालिक’चा मंगेश कदम ऑलिंपियाड चॅम्पियन

कोपरगाव :-आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अंतर्गत सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलातील विद्यार्थी मंगेश कदम याने सिल्व्हर झोन ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क व अभियोग्यता ऑलिंपियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

दरवर्षी या परीक्षेत सीबीएसई व राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळांचे वर्चस्व असते. मात्र यंदा आत्मा मालिकच्या सेमी इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय व विभागीय पातळीवर आपला झेंडा फडकवला हि संकुलाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.

ते म्हणाले की, सिल्व्हर झोन ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क व अभियोग्यता ऑलिंपियाड परीक्षेत आत्मा सेमी इंग्लिश मेडीयम गुरुकुलाच्या एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. तसेच पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक, चार विद्यार्थ्यांनी कांस्यपदक तर २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.

राष्ट्रीय स्तरावर सुजितकुमार गोल्हार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सुवर्णपदक विजेते विद्यार्थी म्हणजे श्रेयष धावडे, कृष्णा धुमाळ, दर्शन गिरासे, प्रणव बादडे, ऋतुराज कारंडे. रौप्यपदक विजेते सिद्धार्थ साळवी, श्रेयष भवर, कृष्णा पाटील, तर कांस्यपदक विजेते साईराज गोरडे, श्रेयष नलावडे, युवराज राजपूत, घनश्याम ढेपे यांचा समावेश आहे
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, पर्यवेक्षक गणेश रासने तसेच अथर्व फाऊंडेशनचे नंदकिशोर भाटे, राहुल मिश्रा व शिवम तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वरपे व मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!