
गुरूकुलाचे 384 विद्यार्थी परीक्षेत पात्र
कोपरगाव : – पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमने मिळविला. या विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी पात्र ठरले. हि संख्या राज्यात सर्वाधिक आहे. अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत पात्र ठरलेल्या ३८४ विद्यार्थ्यांत १० विद्यार्थ्यांनी अडिचशेहून अधिक, ७८ विद्यार्थ्यांनी दोनशेवीसहून अधिक तर १४२ विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक तर २२४ विद्यार्थ्यांनी १८० हून अधिक गुण प्राप्त केले.

इयत्ता आठवी मध्ये तेजस चोंडगीर २६४, मंगेश कदम २६२, वैभवी जाधव २६०, करण चरवांडे २५८, धनंजय दहिफळे २५४ तर स्वराली काळे २५२ गुण मिळविले. इयत्ता पाचवीत सार्थक जोरवर २५६, भूषण धोणे २५४, सार्थक शिंदे २५४, युवराज गर्जे २५०, संकेत साप्ते २४८, आर्यन वाळेकर २३८, प्रद्युम्न घुमरे २३६ गुण मिळविले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.