Homeनाशिकसिन्नरएस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपालकाला उत्सव आनंदात साजरा झाला

एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपालकाला उत्सव आनंदात साजरा झाला

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपालकाला उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री संभाजी जाधव सर यांनी गोपालकाला या उत्सवाचे महत्त्व सांगून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी ठरवून दिलेल्या हाऊस प्रमाणे दहीहंडीची स्पर्धा सुरू झाली यामध्ये मुलांच्या गटात अहिल्यादेवी हाऊसने तसेच मुलींच्या गटात ताराराणी हाऊसने बाजी मारली व प्रथम क्रमांक पटकावला यावेळी शाळेचे सर्व मैदान गोविंदाच्या नावाने दुमदुमून गेले होते व शेवटी शाळेतील एल के जी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ सर यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या हाऊस मास्टर व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!