Homeनाशिकराज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगीता मालकर यांचा सत्कार

राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगीता मालकर यांचा सत्कार

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

         कोरोना काळात तिनशे वीस विधवांचे पुनर्वसन करणाऱ्या,शैक्षणिक बदल समजावून घेऊन नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उपक्रमशील कार्य करणाऱ्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय प्राथमिक शाळा कोपरगावच्या शिक्षिका श्रीमती संगीता मालकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नाशिकच्या आमदार देवयानीताई फरांदे व महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या चिटणीस सुनिताताई खैरनार यांच्या हस्ते पखाल रोडवरील महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेत सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.    
         यावेळी संस्थेचे सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, संचालक वसंतराव अहिरे,माधवराव मोरे,शिक्षणाधिकारी मधुकर बच्छाव,वेध न्युजचे संचालक योगेश कमोद,लेखक तथा कवी जी.पी.खैरनार,तेजश्री काठे,प्राचार्य पोपटराव जाधव, मुख्याध्यापक सुनील शेवाळे,प्राचार्याअनुराधा जगताप,मोहन माळी,गजानन घरटे,सुनिता ससाने,अरविंद मालकर,रणजीत जगताप,शैलेंद्र रास्कर उपस्थित होते.यावेळी संस्थेच्यावतीने सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर यांनी आमदार देवयानीताई फरांदे व सामाजिक कार्यकर्ते वेध न्यूजचे संचालक योगेश कमोद यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो त्यामुळे आदर्श विचारातून विद्यार्थी घडवण्याचे काम त्याला करावे लागते. त्यातून भावी पिढी घडत असते. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा जपण्याचे काम महात्मा फुले समाज शिक्षण संस्था करत आहे असे मत देवयानीताई फरांदे यांनी व्यक्त केले तर या पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढली असल्याने पुरस्काराच्या रूपाने एक ऊर्जाशक्ती निर्माण झाल्याची भावना संगीता मालकर यांनी व्यक्त केली.तर पुरस्काराने कर्तव्याची जाणीव होवुन मनुष्य नव्या उमेदिने कार्यप्रवन होतो असे माधवराव मोरे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकरराव बच्छाव यांनी तर आभार संचालक वसंतराव अहिरे यांनी मांनले यावेळी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!