
४२कोटींची शहराची पाणी पुरवठा योजना ही ४९ कोटींपर्यंत गेली,ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी नगरपालिकेची होती, ती व्यवस्थित पूर्ण करून न घेता, ट्रायल न घेता,ठेकेदाराला राहिलेली डिपॉझिट रक्कम किंवा देणे दिले.याला जबाबदार कोण ?? असा सवाल माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला.

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरामध्ये सर्वात जास्त(हातावर) मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे व छोटे दुकानदार,टपरीधारक यांची खूप मोठी संख्याआहे.महिला मजुर वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.मोल मजूरी करुन कसे बसे ते आपल्या कुटुंबाची भुक भागवत आहे.मागील दोन वर्षांपासून गोरगरीब हातावरच्या मजुरांना हाताला काम नव्हते,त्यांना पोटाला पोटभर खायला मिळत नव्हते त्यात नगरपालिकेचे येणारे अस्वच्छ पाणी,गावभर धूळ,डासांच्या त्रासामूळे उद्भवणाऱ्या आजारांना बळी पडुन दवाखान्यात औषधोपचार करण्यासाठी उसनवारी,कर्ज घेऊन जनतेला विनाकारण नगरपालिकेमुळे भुर्दंड सहन करावा लागत आहे.आणि रोज नियमित स्वच्छ पिण्याचे पाणी द्यायचे सोडून,शहरातील धूळ कमी करायची सोडून,वेळेवर औषध फवारणी व स्वछता करायचे सोडून,रस्ते खड्यात की खड्डे रस्त्यात हे नीट करायचे सोडून,या सुविधा न देता,पट्टी थकली म्हणून खुशाल नळ कनेक्शन तोडत आहे,हे कितपद योग्य,याचा विचार नगरपालिकेने करावा.असे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.
पाटील पुढे म्हणाले कि,दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेने मोठ्या संस्था,शासकीय कार्यालय यांचे कडे असणारी थकबाकीची यादी,आकडे प्रसिद्ध केले,तर त्यांच्या बाबतीत का कठोर वसुली करत नाही ?? हा फरक का ??? नगरपालिकेने जनतेकडून घेण्यात येणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या बदल्यात दररोज स्वच्छ पाणी,उच्चदर्जाचे रस्ते,आरोग्याच्या सुविधा द्याव्या आणि मगच गोरगरीब सामान्य जनतेकडुन हक्कने वसुली करावी.तसेच ज्यांना२४तास,१२तास,६तास पाणी वर्षानुवर्षे बेकायदेशीर पाणी मिळत होते,घेत होते,त्यांची किती पट्टी घेत होते आकारात होते तेही सांगावे ........
सध्या कोपरगाव नगरपालिका आठवड्यातुन म्हणजे ८ (आठ) दिवसातून एकदा पाणी देत आहे.पिण्याच्या पाण्याचे नागरिकांना कॅन विकत घ्यावे लागतात. नगरपालिका महिन्यातुन फक्त ४ दिवस पाणी देते म्हणजे वर्षाला फक्त ४८ दिवस आणि पट्टी आकारणी ३६५ दिवसाची करतात म्हणजे रोज पाणी देण्याची पट्टी /कर घेतात आणि फक्त ४८ ते ५० दिवस पाणी देतात,हे योग्य नाही.गेली अनेक वर्षे नियमाने पाणी पट्टी घेऊन,कमी पाणी देते,तरी नागरिक नियमांनी पट्टी भरतआहे.खरे तर आजही पाणी स्वच्छ येत नाही, अवेळी येते,कधी पाणी येण्याच्या वेळी लाईट जाते,म्हणून पाण्याच्या दिवशी महिलांना कामावरून खाडा करुन घरी थांबावे लागते.
कोपरगाव शहरामध्ये मोलमजुरी करून हातावर पोट भरणारे छोटे मजूर,कारागीर,टपरीधारक,व्यापारी यांची संख्या गांधीनगर,लक्ष्मीनगर,जबरेश्वर मंदिर परिसर,सुभाष नगर,संजय नगर,खडकी,नदीकाठचा परिसर,टिळक नगर,इंडोरगेमहॉल परिसरअसे अनेक ठिकाणी बहुसंख्येने नागरिक राहतात, कोपरगाव शहरामध्ये हाताला काम न मिळाल्याने आपली उपजिवीका भागविण्यासाठी कोपरगाव शहरातून ४०% मजूर जवळच असलेल्या शिर्डी येथे कामासाठी,मोलमजुरी करण्यासाठी जात होते परंतु कोरोना काळात साईबाबांचे मंदिर मागील दोन वर्षापासून बंद असल्यामुळे शिर्डी गावातील व्यवसाय बंद होते.अजूनही शिर्डीला कामाला जाणाऱ्या लोकांना काम मिळत नाही. त्यामुळे नगरपालिकेने कोरोना काळाचा तरी सहानुभुतीपूर्वक विचार करून त्यांना सहकार्य करावे असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी मांडले