Homeनाशिकभगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा जिल्हास्तरीय बक्षीस...

भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ संपन्न

नाशिक (प्रतिनिधी )23 एप्रिल : भगवान महावीर स्वामी २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली असून पर्यटन व सास्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मा. जिल्हाधिकारी नाशिक जिल्ह्यातील समितीचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण वर्षभर देशात व महाराष्ट्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी, व दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी नाशिक जिल्ह्यातील १३६० अनुदानित व विनानुदानित तसेच सर्व माध्यमांच्या खाजगी तसेच शासकीय शाळांनी सहभाग घेऊन या स्पर्धेत १५२४२१ विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदविला.

भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्री ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा) जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष, श्री. जलज शर्मा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नाशिक जिल्हा भगवान महावीर स्वामी निर्वानक कल्याण महोत्सव समिती, श्रीमती करिष्मा नायर, अति.आयुक्त, मनपा. श्री.डॉ. अर्जुन गुंडे,अति, कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक, श्री. संदीप भंडारी, अध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र, श्री. विजय वेदमुथा, सचिव, भगवान महावीर स्वामी काल्याणक महोत्सव समिती नाशिक,श्री.सुमेरकुमारजी काले, वरिष्ठ सल्लागार, भगवान महावीर स्वामी काल्याणक महोत्सव समिती नाशिक, हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात नवकार मंत्राने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेस वंदन करून पूष्पहार अर्पण करून करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातून इयत्ता ५ वी ते ७ वी या गटातून प्रथम सक्षम किरणजी डुंगरवाल, श्री.नेमीनाथ जैनमाध्यमिक विद्यालय,चांदवड ;द्वितीय अर्णव प्रशांत जाधव, श्री.नेमीनाथ जैन माध्यमिक विद्यालय,चांदवड ; तृतीय काव्या निलेश नंदन,मराठा हायस्कूल नाशिक ; चतुर्थ कोमल संदीप मोरे, कर्म. गणपतदादा मोरे जनता विद्यालय, पिंपळगाव बु. ; पाचवा साहील अरुण घुमरे पी. टी. विद्यालय, खेडलेझुंग, निफाड ; तसेच इयत्ता ८ वी ते १० या गटातून नाशिक जिल्ह्यातून प्रथम अनंत सुनील धात्रक, लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय,सिन्नर ;द्वितीय ऋतुजा ज्ञानेश्वर शेवाळे. टी.के.आर.एच. विद्यालय निमगाव. ता. मालेगाव ; तृतीय प्रीतुल योगेश सूर्यवंशी. किलबिल सेंट जोसेफस हायस्कूल, कॉलेज रोड, नाशिक ; चतुर्थ वैष्णवी योगेश वाघ. नूतन जवाहर विद्यालय, मानेगाव. सिन्नर ; पाचवा. वृषाली मीननाथ तांबे. जनता विद्यालय, जळगाव (नेऊर) येवला.

तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी या गटातून उत्तेजनार्थ प्रथमेश शरद आहेर, अभिनव बाल विकास मंदिर, देवळा ; सायली सोमनाथ दिवटे,जनता विद्यालय येवला ; भूमिका किशोर पाटील, के.बी.एच, विद्यालय,पवन नगर, नाशिक ; मनश्री भगवान जाधव, जनता विद्यालय मुंजवाड, सटाणा ; सायली प्रवीण हिरे, टी.आर. हायस्कूल, दाभाडी,मालेगाव ; यशस्विनी रघुनाथ जाधव, नवरचना विद्यालय, नाशिक ;उन्नती हरिदास भोये, के.बी.एच.विद्यालय,हरसुल, त्र्यंबक ; समृद्धी किरण आहेर, य. चव्हाण विद्यालय,निवाने,सटाणा ; अतुल उत्तम कामडी,जी.प.प्राथमिक शाळा, रुईपेठा,पेठ ; काव्या कपिलदेव सोनवणे,जनता इंग्लिश स्कूल, सायखेडा, निफाड.

इयत्ता ८ वी ते १० वी उत्तेजनार्थ स्नेहल शहाजी भोसीकर के.आर.टी. हायस्कूल, सुकेणे,निफाड ;पूनम सुनील माळी,स्वा.सावरकर विद्यालय, कोठुरे,निफाड ;ज्ञानेश्वरी सुनील खालकर,जनता इंग्लिश स्कूल, सायखेडा, निफाड ; श्रेया विठ्ठल शिंदे, जनता इंग्लिश स्कूल,सायखेडा, निफाड ; कावेरी नरहरी पगार, माध्यमिक विद्यालय,वागदर्डी, चांदवड ; श्रावणी वसंत वझेकर माद्यामिक विद्यालय,पिंपळद, नाशिक ; संकृती राजेंद्र उशीर,जनता विद्यालय पवन नगर,नाशिक ; सिद्धी अरुण चव्हाण,डॉ.शा.बोरसे, माध्यमिक विद्यालय,नाशिक ; लक्ष्मण मुकुंदा दळवी,अ.मा.विद्यालय, खेलदरी, चांदवड ; संकृती संजय जाधव, जनता इंग्लिश स्कूल सायखेडा, निफाड. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

तसेच नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अनेक मान्यवरांनी त्यांचे योगदान दिले होते त्यात श्री.नितीन पवार, उपायुक्त तथा प्रशासन अधिकारी, मनपा नाशिक ; श्रीमती मंजुषा घाटगे, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ; श्री. प्रवीण पाटील,शिक्षण अधिकारी माध्यमिक, जि.प. नाशिक ; श्री.गणेश फुलसुंदर,उप शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि.प. नाशिक ; श्रीमती. मनीषा पिंगाळकर, विस्तार अधिकारी, जि.प.नाशिक ; श्रीमती. लता एन. चामणार, महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ; श्री. प्रल्हाद लक्ष्मणराव हंकारे, समन्वयक, मनपा, नाशिक ; श्री. गोपाळ साळुंखे, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय,नाशिक ; श्री.किरण डोळस, उपसंपादक,जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, नाशिक ; श्रीमती संगीता बाफना परीक्षक ; श्रीमती. मंजुषा पहाडे, परीक्षक ; श्रीमती.संगीता सुराणा परीक्षक ; श्री.अक्षय साबळे, परीक्षक ; श्री.महेश मोतीलाल पाटील, कार्यक्रम समन्वयक ; श्रीमती योगिता पाटील,परीक्षक.यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता बाफना यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमेरकुमार काले यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वेदमुथा यांनी केले.

कार्यक्रमच्या यशस्वीततेसाठी भगवान महावीर स्वामी निर्वाणक कल्याण महोत्सव समितीचे अशासकीय समिती सचिव विजय वेदमुथा, मांगीतुंगी क्षेत्राचे अध्यक्ष सुमेरकुमार काले, अशासकीय सदस्य विनोद बेदमुथा, गौतम हिरण, अनिल नहार, कीर्ती बोरा,अमित घोसर, पुनीत कांकरिया, अल्पेश पारख, सचिन शिंगवी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!