HomeUncategorizedलौकी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाबासाहेब खिलारी तर उपाध्यक्षदी यमुनाबाई खटकाळे बिनविरोध

लौकी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाबासाहेब खिलारी तर उपाध्यक्षदी यमुनाबाई खटकाळे बिनविरोध

संपादक – राजेंद्र तासकर
तालुक्याच्या पुर्व भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या लौकी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाबासाहेब माधवराव खिलारी तर उपाध्यक्षपदी यमुनाबाई रामराव खटकाळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदिंनी अभिनंदन केले आहे.
लौकी सहकारी सोसायटीची निवडणुक नुकतीच पार पडली त्यात कोल्हे गटाचे सर्वश्री बाळासाहेब खिलारी,मंथन खिलारी,परिगाबाई साहेबराव डोंगरे,कांताराम आहेर,विजय कदम हे संचालक निवडुन आले.निवडणुक निर्णय अधिकारी श्री.क्षीरसागर यांनी काम पाहिले तर सहायक म्हणून सचिव साहेबराव निकाळे यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब खिलारी व उपाध्यक्ष यमुनाबाई खटकाळे यांच्या निवडीबददल सर्वश्री त्रंबकराव सरोदे,सरपंच चांगदेव इंगळे, निलेश सरोदे,नवनाथ भवर, दत्तात्रय गोडसे,वसंतराव कदम, सुनिल कदम,दिगंबर गोडसे, शिवाजी जाधव,दादासाहेब खटकाळे,रविंद्र वल्टे,साहेबराव डोंगरे,अंबादास खटकाळे,कचरू कदम,सुभाष कदम,यशवंत कदम,विजय भवर,दत्तात्रय खटकाळे,रमेश खटकाळे, भाउसाहेब गोडसे,चांगदेव कदम,आण्णासाहेब खिलारी, अजय खिलारी,लक्ष्मण वल्टे, बाळासाहेब शिंदे,गुलाबराव देशमुख,माणिकराव देशमुख, निवृत्ती वल्टे,श्रीधर देशमुख आदिंनी अभिनंदन केले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब खिलारी म्हणाले की, सभासद शेतक-यांच्या उन्नतीसाठी असणा-या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू,उपाध्यक्ष यमुनाबाई खटकाळे म्हणाल्या की,पुर्व भागाच्या विकासासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी मोठे काम केले असुन आता त्यांच्या तिस-या पिढीने देखील त्याच तळमळींने कोरोना आपत्तीत काम केले आहे.शेवटी सचिव साहेबराव निकाळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!